आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खादीच्या साध्या पोषाखांना तरुणाईची पसंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जीन्स,कॉटन जीन्स आणि विविध नमुन्यातील टॉप आणि टी शर्टपेक्षा वाढत्या उन्हाचा प्रतिकार करण्यासाठी युवक-युवती हे सध्या पांढऱ्या शुभ्र आणि काही ठरावीक रंगांच्या खादींना पसंती देत असल्याचे दिसते.
 
संग्राम कुर्ता आणि नव्या प्रकारच्या पांढऱ्या शर्टना अॅपल शेप देऊन तर काही युवक पांढरा शर्ट आणि पांढरी पँट असे कूल लूकचे कपडे परिधान करत आहेत. युवती बिनबाह्याचे किंवा मोठ्या बाह्यांचे पांढरे अम्ब्रेला ड्रेस आणि त्यावर पांढरी किंवा लाल रंगाची बांधणीची आणि प्लेन रंगाची ओढणी तर होजिअरीच्या चांगल्या गुणवत्तेच्या तंग विजारीही परिधान करत आहेत. त्यात खादीच्या कपड्यांना प्राधान्य दिले जात आहे. काही युवती केवळ पांढऱ्या रंगाच्या पटियाला आणि धोती, विजार त्यावर कोणत्याही रंगाच्या बिन बाह्यांच्या पंजाबी टॉपचा वापर करत आहेत. त्यामुळे खादीच्या कपड्यांना वेगळा चॉइस देत ही युवा पिढी सध्या खादीकडे आकर्षित होताना दिसत आहे.
 
महिला वळताहेत खादी साड्यांकडे
उन्हाच्याझळांपासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक महिला मंडळांनी गणवेश म्हणून पांढऱ्या रंगाच्या साड्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. उन्हाळ्याच्या विविध कार्यक्रमांना या महिलांनी पांढऱ्या साड्यांचा पेहराव करण्याचे ठरवले आहे.
 
अशी आहे नवीन फॅशन
अॅपल कट पंजाबी ड्रेस, पटियाला धोती, अम्ब्रेला कट, डिझायनर अनारकली, साधे पंजाबी टॉप, प्लेन शर्ट, प्लेन पँटस आदी प्रकारचे कपडे सध्या खादी भांडारातून घेऊन शिऊन घेतले जात आहेत.
 
उन्हाळ्यात अधिक जागरूकता
उन्हाळा आला की युवती आणि महिला या कपड्यांच्या बाबतीत जागरूक होताना दिसतात. बऱ्याचदा नेहमी जे कपडे वापरतात ते गरम कपडे बाजूला टाकून उन्हापासून संरक्षण करणारे कपडे शिवले जातात. त्यात पांढऱ्या कपड्यांचे प्रमाण अधिक आहे. करड्या रंगाच्या कपड्यांनाही अधिक महत्त्व दिले जाते.
- अजय लिंगरकर, टेलर
 
बातम्या आणखी आहेत...