आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्ह्यात खजुराची शेती... अवर्षणावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात आता खजुराची शेती होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी गावातील शेतकरी आशिष कस्तुरे यांनी १५ एकरात खजुराची लागवड केली आहे. खजुरात पपईचे आंतरपीक घेतले आहे. आशिष यांनी सांगितले, आमच्या भागात अत्यंत कमी पाऊस होतो. दर ती ते चार वर्षांनी दुष्काळ पडतो. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होते. 
 
खजुराला पाणी अत्यंत कमी लागते, अवर्षणाचा ताण सहन करू शकणारे हे पीक आहे. हे लक्षात घेऊन खजुराची लागवड करण्याची कल्पना सुचली. एका एकरात खजुराची २०० झाडे लागतात.एका झाडापासून १५० किलोपर्यंत फळे मिळतात. या फळांना प्रक्रियेनंतर किलोमागे ३०० ते ४००  रुपये भाव मिळतो. एक एकरातून १० ते १२ लाख रुपयांचे उत्पादन मिळू शकते.
बातम्या आणखी आहेत...