आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपास मिळाला आधार अन् रब्बीच्या तयारीला आला वेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारपासून सर्वत्र हजेरी लावली. पण, बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्यामुळे हाताशी आलेल्या खरिपाच्या पिकांना आधार मिळाला असून, रब्बीच्या पेरणीसाठी चांगली आेल होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ११ मिलिमीटर पाऊस झाला होता.

सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण, पिके वाढीला लागली अन्् पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतीत होता. गणेशोत्सवास सुरुवात होताच पावसाचा श्रीगणेशा होईल, अशी भाबडी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. पण, खरीप पिकांसाठी गरजेचा असणाऱ्या चित्रा नक्षत्राने दडी मारल्याने शेतकरी चिंतीत होता. दिवसभर कडक ऊन अन्् रात्री वारा सुटत असल्याने पिकं कोमेजली होती. पण, मंगळवार दुपारपासून सुरू असलेल्या भीजपावसामुळे खरिपाच्या पिकांना आधार मिळाला आहे. जिल्ह्यात यंदाच्यावर्षी सुमारे ३०० टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. तूर, सोयाबीन, मका पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. उत्तरा नक्षत्राच्या पावसाने खरिपाची पिके हाती येणार आहेत. त्याचबरोबर रब्बीसाठी चांगली आेल होत असल्याने शेतकरी आनंदला आहे. जिल्ह्यात रब्बीचे आठ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सहा लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी होत असते. भीज पावसा नंतर वापसा मिळताच पेरणीला वेग येईल.

जिल्ह्यात बुधवारी १०.८२ मि.मि. पाऊस
सोलापूर सव्वा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शहर जिल्ह्यात भीज पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे या पावसाची १०.८२ मि.मि. इतकी नोंद झाली. सर्वाधिक पाऊस १६ मि.मि. सांगोल्यात झाला आहे. १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २४३ मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली. सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झाला असून १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ३९२ मि.मि. पाऊस अपेक्षित होता. बुधवारी उत्तर सोलापूर १३.५४, दक्षिण सोलापूर १०.१४, बार्शी ९.२०, अक्कलकोट ११.२२, मोहोळ ५, माढा १४.१३, करमाळा २.६३, पंढरपूर १३.३४, सांगोला १६, माळशिरस १५.८०, मंगळवेढा मि.मि. पावसाची नोंद झाली.
बातम्या आणखी आहेत...