आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेडच्या तलाठ्यास लाच घेताना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


उस्मानाबाद - वाटणीपत्राप्रमाणे मंडळाधिकाऱ्यांकडून फेरफार मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडून सात हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी खेड (ता. उस्मानाबाद) येथील तलाठी लेखनिकास अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी (दि.१७) ही कारवाई केली आहे.

तलाठी गोपाळ किसनराव कोळी आणि लेखनिक बाळासाहेब बापूसाहेब वीर यांना अटक करण्यात आली. शेतकऱ्याच्या वडिलाचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांच्या नावावरील खेड येथील जमीन चौघा भावांनी वाटणीपत्र करून वाटून घेतली. त्यानंतर वाटणीपत्राधारे फेरफार मंजूर होऊन ७/१२ अभिलेखात नोंदी घेण्यासाठी तक्रारदारांनी सदर वाटणीपत्रकासह रीतसर अर्जही तलाठी कोळी यांच्याकडे केला होता. त्यांना वारंवार भेटून फेरफार मंजूर करण्याची मागणी केली. परंतु, फेरफार मंडळाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेण्यासाठी तसा ७/१२ देण्यासाठी शेतकऱ्याकडे हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय काम करणारच नाही, असेही सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी (दि.१७) खेड येथे सापळा लावला. तलाठी कोळी यांच्यामार्फत लेखनिक वीर याने हजार रुपये स्वीकारल्यानंतर पथकाने वीर याच्यासह कोळी यालाही अटक केली.

ही कामगिरी पोलिस उपाधीक्षक अश्विनी भोसले, त्यांचे सहकारी पोलिस निरीक्षक आसिफ शेख, पोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव, साहाय्यक पोलिस फौजदार दिलीप भगत, पोलिस नाईक सुधीर डोरले, बालाजी तोडकर, नितीन सुरवसे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल नाईकवाडी, सचिन मोरे, चालक पोलिस नाईक धनंजय म्हेत्रे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...