आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा: धारदार शस्त्राने वार करून पत्नीला संपवले, मग जवानाने केली अात्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - धारदार शस्त्राने अापल्या पत्नीचा खून करुन एका लष्करी जवानाने स्वत:ही छताला गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील गाेडाेली येथील एका लाॅजमध्ये उघडकीस अाली. श्रीकांत बाळासाहेब निमज (वय २९) व नयना अशी मृतांची नावे अाहेत. घरगुती कारणावरून सतत हाेणारी भांडणे, चारित्र्यावर संशय घेणे या कारणावरून ही दुर्दैवी घटना घडली असावी, असा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पाेलिसांनी व्यक्त केला अाहे.
सातारा जिल्ह्यातील श्रीकांत निमज हे लष्करात कार्यरत अाहेत. अापली पत्नी नयना हिच्यासह श्रीकांत यांनी बुधवारी सकाळी गोडोली येथील येऊन राजयोग लॉजमध्ये खोली घेतली हाेती. मात्र, दिवसभर त्यांच्या खाेलीचा दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे लाॅजच्या कर्मचाऱ्याला संशय अाला. त्याने अनेकदा दार ठाेठावून पाहिले मात्र निमज दांपत्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लाॅजच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत व्यवस्थापकाला माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी खाेलीचे दार ताेडून अात प्रवेश मिळवला. त्यावेळी खाेलीत रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला नयनाचा मृतदेह त्यांना दिसून अाला. तसेच श्रीकांत हेही छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत अाढळून अाले. व्यवस्थापकाने तातडीने पाेलिसांना माहिती दिली. श्रीकांत हे नेहमी अापल्या पत्नीवर संशय घेत असत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मारहाण केल्याची तक्रारही नयनाने पाेलिसांत दाखल केली हाेती. घरात नेहमी हाेणाऱ्या कटकटीला वैतागून नयना यांनी अापल्या तीन मुलांना माहेरीच ठेवले हाेते. पाेलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत अाहेत.