आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी मुलांना इमारतींची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुर - पूर्वप्राथमिक शिक्षणाचा पाया असलेल्या अंगणवाडीच्या स्वतंत्र इमारती बांधण्यासाठी कोट्यवधींचा वाढीव निधी मिळाला. पण गावपातळीवर गटातटाचे राजकारण, प्रशासकीय व्यवस्थेच्या निरुत्साहामुळे जिल्ह्यातील तब्बल १०२२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीत. त्याचा फटका चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसतोय. ‘लोकसहभागातून आदर्श अंगणवाडी’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी सोलापूरचा राज्यभरात लौकिक झाला. खासगी शाळांप्रमाणेच अंगणवाडीतील बालकांना युनिफॉर्म, आेळखपत्र, पोषण आहार खाण्यासाठी स्वतंत्र ताट, बसण्यासाठी टेबल-खुर्ची लोकसभागातून मिळाले. अंगणवाडीचा चेहरा बदलल्यामुळे सहा वर्षांखालील बालकं अंगणवाडीत येण्याची संख्या वाढली. परंतु गेल्या तीन वर्षांपासून अंगणवाडीस स्वतंत्र इमारतींसाठी वाढीव निधी मिळवून वर्गखोल्या बांधण्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे चिमुकले समाजमंदिर किंवा उघड्यावर बसून नैसर्गिक कृत्रिम आपत्तींना सामोरे जात पूर्वप्राथमिक शिक्षण अन्् संस्काराचे धडे गिरवत आहेत.
निधी वाढूनही दुर्लक्षच
अंगणवाडीइमारतीसाठी निधी वाढवून देण्याची वारंवार मागणी झाल्याने शासनाने त्यात वाढ करून एका वर्गखोलीसाठी सहा लाखांचा निधी देण्यात आला. वाढीव निधी मिळाल्यानंतर संबंधितांच्या निरुत्साहामुळे इमारत बांधकामाची प्रक्रिया रखडली आहे.

तालुकानिहाय अपूर्ण कामे
तालुका २०१४-१५ २०१५-१६
अक्कलकोट ३० ३५
माढा ३६ २८
मोहोळ ३४ १६
उत्तर सोलापूर २० ११
बार्शी ३८ ३२
दक्षिण सोलापूर ३७ १६
करमाळा ३४ १६
माळशिरस १४ १२
मंगळवेढा ४० १६
पंढरपूर ५३ ३२
सांगोला ३०
एकूण ३६६ २१७

ठोस धोरणाचा अभाव
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंगणवाडीचा अखर्चित निधी रखडलेल्या बांधकामाबाबत फक्त कागदोपत्री आढावा होतो. ठोस कृती धोरणचा अभाव गावांमध्ये जाऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्नच होत नाही. त्यामुळे इमारतींची बांधकाम रखडली आहेत. सूर्यमणीगायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष, अंगणवाडी संघटना

प्रतिसाद नाही
शिंगडगाव(ता. दक्षिण सोलापूर) येथे समाजमंदिरामध्ये अंगणवाडी भरत असून दररोज ३५ ते ४० बालकं उपस्थित असतात. परिसर अस्वच्छ आहे. पावसाळ्यात इमारत गळते. स्वतंत्र इमारत बांधून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला. अद्याप त्यास प्रतिसाद नाही. शांताअचलारे, अंगणवाडी सेविका

स्थानिक ई-टेंडरिंग केले जाईल
अंगणवाडीइमारत बांधण्यासाठी सहा लाखांचा निधी मिळतो. पण ग्रामपंचायतींना पाच लाखांच्या आतील कामं करता येतात. त्यापुढील कामांसाठी ई-टेंडरिंगची गरज आहे. त्यास प्रतिसाद नाही. बांधकाम विभाग एककडे गतवर्षी १९० इमारतींचे बांधकाम प्रलंबित होते. ई-टेंडरिंगला प्रतिसाद मिळत नसल्याने तालुकास्तरावरच ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय घेतला असून त्यास प्रतिसाद मिळतोय. १२० कामांचा कार्यारंभ आदेश दिला आहे. यंदा १४० कामं असून त्याचे अंदाजपत्रक स्थानिक ई-टेंडरिंग करण्यात येईल. ए.ए. खैरादी, कार्यकारी अभियंता, झेडपी बांधकाम विभाग, एक
कामे अद्याप प्रलंबित

Ãसन२०१४-१५ मध्ये जिल्ह्यात १९७ अंगणवाडी इमारतींना मंजुरी मिळाली. त्यापैकी फक्त ६७ कामांचे ई-टेंडरिंग झाले. इतर कामं अद्याप प्रलंबितच आहेत. यंदाच्यावर्षी सन २०१५-१६ मध्ये १३८ शाळा खोल्या बांधण्यासाठी १५ कोटींचा निधी मिळाला. निधी ग्रामपंचायतींना देऊन त्यांच्या मार्फत तातडीने कामं बांधकामाची कामं पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही केले असून ते निश्चित यशस्वी होईल. सुकेशिनीदेशमुख, सभापती- महिला बालकल्याण समिती

१७ अंगणवाड्या उघड्यावर भरतात
जिल्ह्यात१७ अंगणवाड्या उघड्यावर भरतात. सहा वर्षांखालील बालकं नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शिक्षणाचे धडे घेतात. सर्वांधिक ११ उघड्यावरील अंगणवाड्या मोहोळ तालुक्यात, कोळा (ता. सांगोला) चार, मंगळवेढ्यात दोन अंगणवाडी आहेत.

मिनीअंगणवाडींची उपेक्षा
छोट्यावाड्यावस्त्यांवर मिनीअंगणवाडी सुरू करण्यात येतात जिल्ह्यात ९४४ मिनी अंगणवाड्या अाहेत. या अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारती बांधण्याबाबत अद्याप शासनास्तरावरून मंजुरी नाही. त्यामुळे वस्तीवरील एखाद्या छोट्या खोपट्यात अंगणवाड्या भरतात.

अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या
जिल्ह्यात२५० पेक्षा जास्त ठिकाणी अंगणवाड्या समाज मंदिरांमध्ये भरविण्यात येतात. अंगणवाडी सुटल्यानंतर त्या समाजमंदिरांमध्ये दिवसभर परिसरातील लोकांचा वावर असतो. काही ठिकाणी पत्ते अन् जुगाराचे अड्डे चालतात. तंबाखू, गुटखा खाऊन सर्वत्र घाण करतात. अनेकदा नैसर्गिक विधीही उरकण्यात येतात. सकाळी अंगणवाडी भरविण्यापूर्वी सेविका मदतनीस यांना ती घाण काढावी लागते. दुर्गंधी अन् परिसराच्या अस्वच्छतेमुळे बालकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.

शहरालगतच्या गावातील विदारकता
मंद्रूप(ता. दक्षिण सोलापूर) येथील संजयनगरात अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारतीची गरज आहे. जागा उपलब्ध नाही या कारणात्सव निंबर्गी-मंद्रूप या रहदारीच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या विठाईनगरातील जागा सुचवली आहे. चार वर्षांपूर्वी माळीगल्ली येथे स्वतंत्र इमारत मंजूर झाली. पण जागेचा तिढा निर्माण झाला. आता पुन्हा तिसऱ्यांदा निधी परत जाण्याच्या मार्गावर असल्याने सार्वजनिक विहिरीच्या जवळपास जागा बांधकामासाठी प्रस्तवित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

चुकीच्या जागांच्या शिफारसी
अंगणवाडीच्या इमारतींसाठी काही ग्रामपंचायतींकडून बालकांसाठी सोईस्कर जागा आवश्यक असते. पण काही ग्रामपंचायतींनी रहदारीच्या रस्त्यापलीकडे, स्मशानभूमी किंवा सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक विहीर (आड) याच्या जवळपासच्या जागांची शिफारस केली होती. बांधकाम विभागाने त्या जागी अंगणवाडी बांधणे योग्य नसल्याचे सांगून प्रस्ताव परत पाठविले. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

गावपातळीवर राजकरणाचा फटका
अंगणवाडीइमारतीचे बांधकाम रखडण्यास गावपातळीवर गट-तटाचे राजकीय वैमनस्य कारण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी इमारत बांधण्यासाठी आवश्यक ठिकाणची जागा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष, बांधकामास अडथळे निर्माण करणाऱ्यांना पाठबळ देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे इमारतींसाठी निधी मिळून अखर्चित राहणे परत पाठवण्याचे प्रकार घडतात. शिवाय प्रशासकीय उदासीनतेचा फटकाही या अंगणवाड्यांना बसत आहे.

ई-टेंडरिंगमुळे होतेय ठेकेदांराचे दुर्लक्ष
बांधकामाची कामं मिळवण्यासाठी पूर्वी मजूर संस्था, काही लोकप्रतिनिधी त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नशील असायचे. एका कामासाठी दोन-चार इच्छुकांमध्ये स्पर्धा लागायची. परंतु गेल्या काही वर्षांपासून शासनाने संगणकीकृत कामकाज पद्धत सुरू केल्यापासून इच्छुकांची संख्या घटत गेली. प्रत्येक कामाचे ई-टेंडरिंग करण्याच्या सक्तीमुळे ठेकेदारांनी परवडत नसल्याच्या कारणात्सव अंगणवाडीच्या वर्गखोल्यांचे बांधकाम थांबले.

समन्वयाचा अभाव
अंगणवाडीचीएक इमारत बांधण्यासाठी पूर्वी साडेचार लाख रुपयांचा निधी होता. त्यानुसार कोट्यवधींचा निधी जिल्ह्यास मंजूर झाला. परंतु वाढत्या महागाईमुळे साडेचार लाख रुपयांमध्ये इमारत बांधणे परवडत नसल्याचे कारण पुढे करीत त्याकडे दुर्लक्ष केले. दहा टक्के निधी वापरून ग्रामपंचायतींनी अंगणावाडीच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा ठराव झेडपीच्या बैठकीत झाला. पण त्याबाबतचा पाठपुरावा मात्र नाही.

सन उद्दिष्ट मिळालेला निधी पूर्ण झालेली कामं
२०१०-११२५९ दहा कोटी ३६ लाख २०५
२०११-१२ ३०१ १३ कोटी ५६ लाख २८१
२०१२-१३ १९२ आठ कोटी ५७ लाख १२२
वित्त आयोग २०११-१२ ७० दोन कोटी ६६ लाख ४९
वित्त आयोग २०१२-१३ ९२ दोन कोटी ७५ लाख ३१
डीपीसी २०१३-१४ १४९ चार कोटी ९६ लाख ६७
डीपीसी २०१४-१५ ३६७ १४ कोटी ५० लाख 0५
३२६९ जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या
लाख ९१ हजार १६६ बालके अंगणवाडीत शिकतात
१०२२ अंगणवाडींना स्वत:ची इमारतच नाही
१६जिल्ह्यात अंगणवाडींचे प्रकल्प
५०९ ठिकाणी खासगी मंदिर देवळांमध्ये भरतात अंगणवाड्या.
२६० ठिकाणी समाजमंदिर, घरांमध्ये भरतात शाळा.