आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानासाठी कुतूहल जपा : लेखक अच्युत गोडबोले यांचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक अच्युत गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. (डावीकडून) कुलसचिव एस. के. माळी, श्री. शिंदे, गोडबोले कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार. - Divya Marathi
लेखक अच्युत गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. (डावीकडून) कुलसचिव एस. के. माळी, श्री. शिंदे, गोडबोले कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार.
सोलापूर- प्रत्येक गोष्टीबाबत आपल्यात कुतूहल असले पाहिजे, हे शिकत गेलो. प्रत्येक गोष्टीतले बारकावे समजावून घेतले. साहित्य, संगीत, चित्रपट हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाइतकेच महत्त्वाचे असते. अर्थात, असे प्रत्यक्ष कोणी सांगितले नाही. मला कळत नकळत बिंबले, हे खरे’, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
सोलापूर विद्यापीठाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठ सभागृहात कार्यक्रम झाला. रुपये २५ हजार रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री. गोडबोले यांनी आपल्या जडण-घडणीविषयी अनुभव सांगत विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. त्यासाठी असलेले निसर्गसुलभ ‘कुतूहल’चे महत्त्व त्यांनी विशद केले. ते म्हणाले की, आपण एकाच विषयाचा अभ्यास करतो. त्यात प्रगती करतो. अर्थात त्यात खऱ्या अर्थाने किती प्रगती करत असतो हा भाग वेगळा. पण एकाच विषयात ज्ञानार्जन, डिग्य्रा मिळवतो. पण ज्ञान आणि त्यातील कुतूहल किती मिळवतो? कुतूहलता, उत्सुकता वाढवली गेली पाहिजे. गुणांच्या मागे धावण्यापेक्षा त्या विषयाचे ज्ञान घेताना आपण किती कुतूहलता दाखवतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
‘झेंडुची फुले’ आणि वनस्पतीशास्त्र विभाग
पुस्तके,लेखन वाचनाची उदासीनता याबद्दल ते बोलले. याविषयी आचार्य प्र. के. अत्रे यांचा प्रसिद्ध किस्सा ऐकवला. आचार्य अत्रे यांना एकदा एका महाविद्यालयाने प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. वर्ग दाखवले, प्रयोगाशाळा दाखवली. अत्रे म्हणाले, ग्रंथालय असेल तर पाहुयात. ग्रंथालय दाखवले. अत्रे म्हणाले, वा छान, माझी काही पुस्तके असतील की. त्यांची पुस्तके दाखवली. पण त्यात ‘झेंडूची फुले’ हा काव्यसंग्रह नव्हता. खूप शोधाशोधनंतर ते सापडले, वनस्पती शास्त्राच्या रकान्यात. ‘झेंडूची फुले’ या नावावरून ते वनस्पतीशी संबंधित पुस्तक असल्याचे समजून तेथे ठेवले होते.

सोलापूरने मला घडवले
अनेकपारितोषिके मिळालीत, पण हा जीवनगौरव सर्वांत महत्त्वाचा आहे. जेथे माझी जडणघडण झाली, त्या सोलापुरात मिळालेला आहे. मुख्यत: विद्यापीठाने दिलेला आहे. माझ्या घडणीत सोलापूरचा मोठा वाटा आहे. पुण्या-मंुबईत राहून, शिकून चांगली घडण होते, असे नाही. मी विचार करतो, मला साध्य करता आले कसे? माझे वडील, मुख्यत: माझी बहिणी सुभलाताई, पुष्पाताई यांनी मला जी दृष्टी दिली, संस्कार दिले, ते महत्त्वाचे आहेत, असे गोडबोले म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...