आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडागर्दी, छेडछाड रोखण्यासाठी 10,900 रोडरोमिओंचा केला बंदोबस्त, विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे- पाटील यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - कोल्हापूर परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यापासून दहा हजार नऊशे रोडरोमिओंवर कार्यवाही केली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील गुंडागर्दी, अवैधधंदे छेडछाड, माफियागिरी पूर्ण बंद व्हावी यासाठी पोलिस दल कर्तव्यपार पाडत अाहे, अशी ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. तर मटका व्यवसायात तडीपारीची कारवाई झालेले काहीजण स्थगिती मिळवून लोकप्रतिनिधी झाल्याची खंत पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी व्यक्त केली. 
 
मंगळवेढा पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित पोलिस जनता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख मनीषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके आदी उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा पोलिस स्टेशन येथील अभ्यागत कक्षाचे उद्््घाटन पोलिस हवालदार पुजारी यांच्या हस्ते झाले. 
 
यावेळी पोलिस अधीक्षक प्रभू यांनी नंदेश्वर येथील नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु दोन राजकीय गट असल्याने तो प्रस्ताव परत आला आहे. काही जण निंबोणीची मागणी करतात तर काही नंदेश्वरची करतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी आयोजित जनता संवाद कार्यक्रमात नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडले. 
 
कायद्याच्या पळवाटेमुळे गुन्हेगार सुटतात 
तालुक्यातील मटका या अवैध धंद्यामधील पंधरा लोकांवर तडीपारीची कारवाई केली होती. परंतु कायद्यातून पळवाट काढून स्थगिती आणली त्यातील काहीजण लोकप्रतिनिधी झाले आहेत, अशी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी खंत व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...