आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियाच्या डॉक्टरांकडून ५०० रुग्णांची तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दक्षिण कोरियातून आलेल्या डॉक्टरांच्या टीमकडून शहरातील ५०० रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. ४५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले.

सुंदरमनगर येथील मनपा शाळा क्र. २८ मध्ये सकाळी ते यावेळेत एम. ए. मागासवर्गीय संस्था स्प्रिंग ऑफ डजर्ट दक्षिण काेरिया यांच्या संयुक्त विद्यामाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व रोगनिदान औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीसाठी दक्षिण काेरियातील डॉ. किम चॉगू, डॉ. हान थी ही, डॉ. किम चाॅग वूक आदी तज्ज्ञ डॉक्टरांसह २८ जणांचे पथक होते. शिबिराला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी भेट देऊन पाहणी केली.

गरिबी हटाव झोपडपट्टी एक दोन, सोनिया राजू नगर, सुशील नगर, सुंदरमनगर आदी नगरांसह उळे, कासेगावमधील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. समारोपप्रसंगी कोरियन डॉक्टरांच्या पथकाचा सत्कार नगरसेवक मधुकर आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.
सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आठ वर्षांपासून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शिबिरात गरजू लोकांना मोफत सुविधा देण्यात येतात. साधारणपणे ५०० हून अधिक रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. मधुकर आठवले, नगरसेवक
सोलापूरसह पुणे,अक्कलकोट उस्मानाबाद या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहेत. गरिबांना आरोग्य सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे. सेवाभावी संस्था दानशूर व्यक्तींच्या अार्थिक मदतीतून हे शिबिर घेण्यात आले. सेझी निकम, अध्यक्ष, स्प्रिंग ऑफ डजर्ट, कोरिया
बातम्या आणखी आहेत...