आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"क्रांती'कारी नरनारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात २००८ पासून क्रांती महिला संघ नामक एक संस्था कार्यरत आहे. सध्या विजापूर रस्त्यालगतच्या मयूर मंगल कार्यालयसमोर याचे कार्यालय आहे. या संस्थेव्दारे शहर जिल्ह्यात एड्स रोगापासून दूर राहण्याचे प्रबोधन, बाधित महिला त्यांच्या पाल्यांना विविध रोजगार, सेवासुविधा, योजना यांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. यात मुख्य भूमिका ठरते ती रेणूका जाधव या तरुणीची.

एमएसडब्लूसारखी उच्चविद्याविभूषित अशी ही तरुणी मागील बऱ्याच वर्षांपासून ही सेवा बजावत आहे. रेणुका सांगतात, त्यांच्या आजी स्वत: वेश्या व्यवसायात होत्या. जेव्हा रेणुका शिकत होत्या, तेव्हा त्यांना लोक तिरस्काराने पहायचे की या एका वेश्येची नात आहे. पण आजीने आईला या व्यवसायात न आणता शाळा शिकवली. आईचे शिक्षण दहावी झाले. पण आईने या यातना भोगत समाजाचा विरोध घेत संस्थेविना आपले कार्य सुरू ठेवले होते. सध्या रेणुका याचे सर्व कामकाज पाहतात. तसेच शिधापत्रिका, विविध योजना, घरेलू कामगार योजना, बालसंगोपन योजना त्यांच्या मुलांना, हसरी दुनिया या एचआयव्हीबाधित मुलांसाठी सकस आहार, शैक्षणिक साहित्य योजना देण्याचे संस्थेचे ध्येय आहे. केवळ औषधे देऊन काम होत नाही तर समुपदेशन करणे हे आमचे मुख्य काम. यात आम्ही यशस्वी आहोत. या कामासाठी पुरस्कारही मिळाल्याचे त्या सांगतात. अशा या समाजाप्रती योगदान देणाऱ्या नरनारींना सलाम.
फॅमिली अँड चाइल्ड या विषयात पदविका मिळवलेल्या रेणुका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रबोधन, एचआयव्ही प्रिव्हेंशन आदी बाबी महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण प्रकल्प अर्थात एमसॅक्स यांच्याकडून करतात. लोकांचा दृष्टिकोन बदलण्यात त्यांना यशही आले असून यामुळे एचआयव्ही रेट कमीही झाला आहे. तसेच समाजात या महिलांबाबत गैरसमजुती दूर करण्याचे काम सुरूच आहे. या महिलांना अधिकार प्राप्त व्हावेत. त्यांचा स्वत: कलंकित अाहाेत हा समज आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न उद्देश क्रांतीचा आहे. सर्व ठिकाणी त्यांना समान वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न आहेत.
अतुल्य ही ध्येयासक्ती, जेथेआसमानही हात टेकती या उक्तीप्रमाणे कोण कशाचा ध्यास घेईल याचा नेम नाही. त्यातल्यात्यात तो तरुणाईने घेतला तर अजबच. वयाची पंचविशी म्हणजे तसं मोठं वयोमान नाही हो. पण समाजाच्या तुच्छ नजरा, तो तिरस्कार याने पेटून उठत शहरातील काही तरुण-तरुणी एका वेगळ्याच ध्येयाने मार्गक्रमण करत आहेत. त्यांना हवा आहे निरोगी भारत, सबल भरत, सशक्त भारत. म्हणून ही मंडळी एचआयव्ही या असाध्य रोगापासून रक्षण करण्याचे धडे भविष्यातील संधी याचा प्रचार प्रसार करत आहेत.
एचआयव्ही (एड्स) या महाभयंकर रोगासंदर्भात सोलापुरात प्रबोधन करत स्वत:ला वाहून घेतलेली ही तरुणाई. मध्यभागी टीम लीडर रेणुका जाधव यांच्यासह प्रभावती आखाडे, सुलक्षणा डोके, सुजाता बत्तुल, ज्योती मंटूरकर, प्रशांत बिराजदार सहकारी.