आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krushna Bhima Important Stabilization, Otherwise Farmers Affected

कृष्णा-भीमा स्थिरीकरण महत्त्वाचे, अन्यथा शेतकऱ्यांची होईल होरपळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्याचीवरदायनी असलेल्या उजनी धरणातून शेजारच्या राज्यांना पाणी देण्यात येत असून ते योग्यही आहे. पण, धरणात येणाऱ्या पाण्यावर खासगी प्रकल्प उभारण्यात येत असून पाणी अडवल्यामुळे शेती सिंचन पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होतेय. धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी घट झाली असून धरण पूर्णक्षमतेने भरले नाही तर सिंचनासाठी पाणी मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होरपळ होईल. त्यामुळे कृष्णा-भीमा स्थिरीकरणामुळे अतिरिक्त पाणी जिल्ह्यास मिळाल्याने होरपळ थांबेल. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असा पुनरूच्चार खासदार विजयसिंह मोहिते यांनी केला.
जिल्हा परिषद बांधकाम विभागतर्फे देणाऱ्या येणाऱ्या आदर्श अभियंता पुरस्कारांचे वितरण खासदार मोहिते यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरात झाले. जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी आमदार हनुमंत डोळस, दीपक साळुंके, सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, झेडपीचे कृषी सभापती पंडित वाघ, शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुकेशिनी देशमुख, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे, विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार, सदस्य सुरेश हसापुरे, सुभाष गुळवे, मोहन लोंढे, अशोक शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. बनसोडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या विकासास कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना फायदेशीर असल्याने त्याच्या मंजुरीस जनतेमधून उठाव होण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. राजन पाटील, माजी आमदार
“ग्रामीण शहर विकासात अभियंत्याची भूमिका महत्त्वाची. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाली” दीपक साळुंके, आमदार

अभियंत्यांचा विकास प्रगतीत मोलाचा वाटा
अभियंतादेशाची प्रगती वैभवाचा पाया असून सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. झेडपी पदाधिकाऱ्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला असून त्या निमित्त विविध विकास योजना राबवल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा गायकवाड यांनी सांगितले. उपाध्यक्ष तथा बांधकाम समितीचे सभापती शहाजीराव देशमुख यांनी प्रास्तविकात बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेतला.
आदर्श अभियंता पुरस्कारांचे वितरण खासदार मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, हनुमंत डोळस, दीपक साळुंके, सिद्धाराम म्हेत्रे, राजन पाटील आदी.
२५ कोटींचा निधी शासनाकडे परत गेला तर जाऊ द्या

आमदारहनुमंत डोळस म्हणाले, “जिल्हा परिषदेकडील २५ कोटी रुपयांचा अखर्चित निधी शासनाकडे परत गेल्याची बातमी वृत्तपत्रात वाचण्यात आली. झेडपीच्या योजना फारच किचकट अससल्याने काही निधी अखर्चित राहतोच. सर्व पदाधिकारी चांगले काम करत आहेत. फक्त २५ कोटींचा निधी परत गेल्याच्या बातम्या आल्यामुळे चिंता करण्याचे कारण नसून निधी गेला तर जाऊ द्या, असे सांगत अखर्चित निधीबाबत पदाधिकाऱ्यांचे समर्थन केल्याने सभागृहातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.