आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुकडीचा डावा कालवा कर्जत परिसरात फुटला, करमाळ्याला सोडलेले पाणी येण्यास विलंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा - कुकडीच्या डाव्या कालव्यातून केवळ पिण्यास कर्जत, नारायणगाव, जामखेड, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांसाठी सोडण्यात आलेले पाणी वेगाने खाली येत असताना नांदगाव (ता. कर्जत) येथे कॅनॉल फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून वाया जात आहे. कॅनॉल दुरुस्तीनंतर मांगी तलावात आणखी दोन दिवस उशिराने पाणी पोहोचणार आहे. दरम्यान, नांदगाव शिवारातील कुकडीचा डावा कालवा फुटला, का फोडण्यात आला, का नादुरुस्त झाला याबाबत करमाळा तालुक्यात उलट-सुलट चर्चा आहे.

राज्य सरकारने कुकडी डाव्या कालव्यातून नारायणगाव, श्रीगाेंदा, कर्जत करमाळा तालुक्याला पाणी देण्याचे नियोजन करून पाणी सोडले होते. पाणी सोडताना जमावबंदी लागू केली होती. पोलिस राज्य राखीव पोलिस दलही पाण्याच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले होते. सोडलेले खाली वाहत येणारे पाणी सहजासहजी कॅनॉल फोडून घेता येत नाही. जाणीवपूर्वक काहींनी हा कॅनॉल जेसीबीच्या सहाय्याने फोडून पाणी ओढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यांच्या मागणीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे पाणी मिळावे यासाठी पोलिस बंदोबस्तात पाणी पोहोचवण्याचे नियोजन प्रशासनाने शासनाने केले होते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पोलिस बंदोबस्तात असलेला कॅनॉल कसा फुटला, याबाबत संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे.
गाळ साचल्यानेझाडेझुडुपे वाढल्याने कॅनाॅल फुटला. कॅनाॅल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू अाहे. बी. एम. जगताप, उपअभियंता,कुकडी प्रकल्प

कॅनाॅलची दुरुस्तीकरून पाणी लवकरच मांगी तलावात पोहोचावे यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला अाहे. हे काम जलद गतीने व्हावे यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. नारायण पाटील, आमदार करमाळा