आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मांस वाहतूक करताना काळजी घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गोवंशहत्या प्रतिबंधक कायद्याचे पालन करा. शहरातून मांस वाहतूक करताना सुरक्षितता बाळगा. बंदिस्त वाहनांतूनच मांस, हाडे, कातडी यांची वाहतूक करा. कुणाच्या भावना दुखावतील असे काम करू नका, असे आवाहन पोलिस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी केले. शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात कुरेशी समाजाची बैठक झाली.

अधिकृत कत्तलखान्यातून मांस नेताना उघड्या वाहनातून वाहतूक करू नका. गुरे, कातडी वाहतूक करताना अधीकृत प्रमाणपत्र घ्या, असे आवाहन करण्यात आले. या वेळी सहायक पोलिस आयुक्त महिपती इंदलकर, दत्तात्रय घोगरे यांच्यासह पोलिस निरीक्षक, कुरेशी समाजातील नागरिक उपस्थित होते.

नियमांचेपालन करू
कुरेशीसमाजाच्या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करू. नियमानुसार काम करू, अशी भूमिका राजू कुरेशी यांनी मांडली. या वेळी खाटीक समाजाचे अध्यक्ष राज्याचे उपाध्यक्ष हाजी आयुब कुरेशी, युसूफ कुरेशी,अलीम कुरेशी, बाबा कुरेशी, सत्तारभाई कुरेशी यांच्यासह शंभराहून अधिक समाजबांधव उपस्थित होते.