आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची आत्महत्या, गृहकर्जाचे हप्ते फेडण्याचा सासरच्या लोकांनी लावला होता तगादा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माहेरून गृहकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी एक लाख रुपये आण, असा तगादा सासरच्या लोकांनी लावल्याने विवाहितेची आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहोळमध्ये 19 एप्रिलला ही घटना घडली असून शहनाज मुलाणी असे मृत महिलेचे नाव आहे. शहनाजच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू, सासरे आणि दीराविरोधात तब्बल आठ दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहनाज ही मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम गावची रहिवासी होती. 5 मे 2015 रोजी बार्शी येथील शकील मुलाणीसोबत तिचा विवाह झाला होता. कळसे नगरात नांदायला आलेल्या शहनाजचे सासरचे लोक पैशांसाठी तिचा छळ करत होते. असा आरोप शहनाजच्या आई-वडीलांनी केला आहे.

गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आण, असा दबाब शहनाजवर सासरचे लोक आणत होते. तिला मारहाणही केली जात होती. सासरच्या जाचाला कंटाळून शहनाज हिने 19 एप्रिलला स्वत:ला पेटवून घेतले होते. दुसर्‍या दिवशी 20 तारखेला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. चौकशीनंतर मोहोळ पोलिसांनी पती शकील मुलाणी यांला पोलिसांनी अटक केली असून सासू, सासरे आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...