आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण, प्रभाव क्षेत्रातील जमिनींचे व्यवहार महागले; मुद्रांक शुल्कात एक टक्क्याची वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्य शासनाने ग्रामीण, प्रभाव क्षेत्र बक्षीसपत्रामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये टक्के वाढ केल्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार महागले आहेत. यामुळे आता नागरिकांना एक टक्के अधिक रक्कम मुद्रांक शुल्कच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी सप्टेंबरपासून सुरू करण्यात आल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी एस. एन. दुतोंडे यांनी दिली. 
 
ग्रामीण क्षेत्रात टक्के मुद्रांक शुल्क आकारणी केले जात होती. आता ती टक्के झाली आहे. प्रभाव क्षेत्रात टक्के होते. ते टक्के झाले आहे. तर बक्षीसपत्राला दोन टक्के मुद्रांक शुल्क होते. आता तीन टक्के झाले आहे. यामध्ये रक्तसंबंधाच्या नात्यांमध्ये होणाऱ्या बक्षीसपत्रास मुद्रांक शुल्क लागणार नाही. उदा. आई वा वडिलांकडून मुलगा, मुलगी, नात, नातू यांना मालमत्ता हस्तांतर करताना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. पण याऐवजी भावांकडून भाऊ वा बहिणीस, बहिणीकडून भावास, इतर नातेवाइकांस हस्तांतर करताना तीन टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. शहरातील जमीन व्यवहाराच्या मुद्रांक शुल्कामध्ये कोणतीही वाढ केली नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...