आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भूविकास’ची आेटीएस योजना, शेवटची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (भूविकास)मधील कर्जदारांसाठी ‘आेटीएस’ (एकरकमी कर्ज परतफेड योजना) लागू झाली आहे. त्याची मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. ३१ मार्च २००४ रोजी सभासदांच्या खात्यावर येणे असलेल्या मुदलावर टक्के सरळव्याज दराने रकमेची अाकारणी करण्यात येईल. मुदलाखेरीज उर्वरित व्याज, थकीत व्याज, दंड व्याज माफ करण्यात येणार आहे. या योजनेसाठी २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी असल्याचे शासनाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले अाहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे प्रशासक नारायण आघाव, जिल्हा व्यवस्थापक एच. बी. हत्ताळे यांनी केले आहे.

लोकशाही दिन आवाहन
आॅक्टोबर महिन्यातील लोकशाही दिन तीन आॅक्टोबर रोजी सकाळी दहापासून मनपाच्या जुन्या सभागृहात होणार आहे. त्यासाठी अर्ज करू इच्छुणाऱ्यांनी १७ सप्टेंबरपर्यंत महापालिका जनसंपर्क कार्यालयात अर्ज करावेत.
बातम्या आणखी आहेत...