आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अच्छे दिन आनेवाले हैं या छक्कड लावणीने गाजला पहिला दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - येथील लावणी स्पर्धेला शुक्रवारी (दि. २९) दिमाखात सुरुवात झाली. सारिका नगरकर यांच्या अच्छे दिन आनेवले हैं...या छक्कड लावणीने आजचा दिवस गाजला. यंदा २४ व्या वर्षीही लावणीने अकलूजला भुलवले. तसेच या वेळी रेश्मा परितेकर यांना सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील लावणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

लावणी कलावंत रेश्मा परितेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते, संयोजक समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते, पांडुरंग घोटकर, सरलाबाई नांदुरेकर आदी उपस्थित होते. मुंबई येथील प्रदीप शिंपी यांच्या नटखट सुंदरा या संघाने सर्वप्रथम सादरीकरण केले. लावणी स्पर्धेत खरा रंग भरला सारिका नगरकर आणि कीर्ती देशमुख यांच्या नखरेल नारी या लावणी संघाने. या चमूने भारदार असा मुजरा सादर करून दमदार सुरुवात केली. त्यानंतर नगरकर आणि देशमुख यांची जुगलबंदी दाद घेऊन गेली. सुप्रिया जावळेकर यांच्या चार चौघीत लाज मला वाटली.... ही लावणी रसिकांनी उचलून धरली.

विषमतेचे सादरीकरण
सारिका नगरकर कीर्ती देशमुख यांनी लावाणीतून आजच्या विषम परिस्थितीचे चित्रण सादर केले. परितेकरांना पुरस्कार या वेळी रेश्मा परितेकर यांना सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील लावणी पुरस्कार देऊन गौरवले. खासदार मोहिते यांच्या हस्ते परितेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.