आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरेही सुटली ‘एलबीटी’तून, किंचित लाभ बजेटमधून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर - ५०कोटी रुपयांच्या खाली वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना ‘एलबीटी’(स्थानिक संस्था कर)मधून वगळण्यात आले. याचा फायदा बांधकाम क्षेत्रालाही मिळणार आहे. प्लॉट खरेदी करताना एक टक्का, प्लॅन मंजूर करताना कंपोजिट स्कीममध्ये सात मजली इमारतीस २०० रुपये प्रती चौरस मीटर अशा पद्धतीच्या ‘एलबीटी’तून आता सुटका झाली. त्यामुळे घर घेण्याचे स्वप्न बाळगून असणाऱ्यांचे बजेट किंचित कमी होईल.

फ्लॅट घेताना प्रती चौरस फूट १५ रुपये ‘एलबीटी’चा दर होता. म्हणजेच हजार चौरस फुटाचा फ्लॅट १५ हजार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. ‘एलबीटी’च्या नव्या प्रणालीत सर्वसामान्यांना गृहस्वप्न साकारण्यास काही अंशी दिलासा मिळेल. बांधकाम व्यावसायिकांनी मात्र याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एक बिल्डर म्हणतात, “एलबीटी बिल्डरच भरत होता. त्याशविाय त्याला बांधकाम परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे ‘एलबीटी’शी ग्राहकाचा थेट संबंध कधीच आला नाही. याचाच अर्थ घरांच्या किमती कमी होतील असे नाही.” दुसऱ्या एका बिल्डरने मात्र सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांचे म्हणणे असे की, बांधकाम साहित्यावरील एलबीटी हटल्याने बिल्डरांना दिलासा मिळाला आणि ग्राहकांना त्याचा थोडा लाभ देण्यात मदत होईल.

मुद्रांकशुल्क "जैसे थे'
५०कोटी रुपयांच्या खाली उलाढाल असणाऱ्या व्यवसायांना एलबीटीतून वगळल्यानंतर मुद्रांक शुल्कात किमान टक्क्यांची वाढ होईल, असा अंदा होता. तसे झाले असते तर ‘एलबीटी बरी होती रे बाबा..!’ असे म्हणण्याची वेळ आली असती. कारण त्याचा अधिभार थेट ग्राहकांवरच पडला असता.

ग्राहकाला थोडासा लाभ
‘एलबीटी’भरल्याशविाय बांधकाम परवानगी मिळत नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक अगोदरच स्वत:च्या खिशातील पैसे भरून गृहप्रकल्प उभारत. आता एलबीटी नसल्याने ग्राहकाला थोडासा लाभ होईल. शविाय बिल्डरही रिटर्न्स भरण्याच्या भानगडीतून सुटतील.” सुनीलफुरडे, क्रेडाई अध्यक्ष सोलापूर

घरांच्यादरात फरक नाही
फ्लॅटघेणाऱ्यांचा एलबीटीशी थेट संबंध कधीच आला नाही. कारण बिल्डरच ही रक्कम भरत होता. फ्लॅट देताना पुन्हा त्याची वसुली हा प्रकारही नाही. त्यामुळे एलबीटी नसल्याने घरांचे दर कमी होतील, असे नाही. थोड्या फार वाचणाऱ्या रकमेने ग्राहकाचेही समाधान नाही.” राजेंद्रशहा, बांधकाम व्यावसायिक
बातम्या आणखी आहेत...