आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उगीच गप्पा नकाे, कर्मचारी मॅनेज झाल्याच्या आहेत तक्रारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - थकीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली होत नसल्यामुळे महापालिका आयुक्तांनी एलबीटी विभागातील ११५ कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मनपा कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त विजयकुमार काळम - पाटील यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले. एक कोटीची वसुली करून दाखवा मिनिटात पगार देतो, असे ते म्हणाले. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वडवेराव आणि आयुक्त यांच्यातील संवाद जसेच्या तसे येथे देत आहोत.
आयुक्त - हेलोक काहीच करत नाहीत.
वडवेराव- म्याकलवारसाहेबांना (एलबीटी विभागप्रमुख) विचारा की वसुलीचं.
आयुक्त- माझ्याकडेप्रचंड तक्रारी आहेत परस्पर मॅनेज केल्याच्या. वसुली मात्र काहीच नाही.
वडवेराव- तेअसेल की साहेब. अॅडजेस्टमेंट झाले असेल तर तुम्ही चौकशी करा. आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. सर्वांना वेठीस धरणे उपयोगाचे होणार नाही.
आयुक्त- वेठीसनाही हो, हे लोक कामच करत नाहीत.
वडवेराव- तुम्हीकाम करून घ्या की मग.
आयुक्त- कायकाम करून घ्या. आज शहराचा विकास थांबलाय. एमएसईबीने वीज खंडित करण्याची नोटीस दिलीय आज. अडीच कोटी भरायचे आहेत अन् तिजोरीत आहेत ५१ लाख. कशासाठी लाड करायचे यांचे?
वडवेराव- लाडकरा असे आम्ही म्हणत नाही. नियमाने जे करायचे ते करा, आमचे काहीच म्हणणे नाही. संघटना त्यांना पाठीशी घालणार नाही.
आयुक्त- कामकरता पैसे कसे द्यायचे? पाच, दहा रुपयांच्या वसुलीने काय होणार.
वडवेराव- आताएक कोटी रुपये वसुली झाली साहेब. चार दिवसांत.
आयुक्त- कुठेआहे वसुली, दाखवा मला.
वडवेराव- (कर्मचाऱ्यांकडेपाहात) तक्ता करून आणा म्हणलो होतो, आणला नाही?
आयुक्त- कानाही आणला ?
वडवेराव- सर्वजणपुढे या. दिसू द्या साहेबांना सगळे.
आयुक्त- पगारीइतकीसुद्धावसुली नाही यांची.
वडवेराव- साहेबआज १६ लाखांची वसुली आहे.
आयुक्त- चेकअसेल तो वटण्यासाठी चार दिवस लागतात. असे कितीतरी चेक आहेत जे वटले नाहीत. परवा २१ लाखांचा चेक होता, पण तो वटला नाही.
वडवेराव- आम्हालाआदेश द्या, संरक्षण द्या. आम्ही दुकाने बंद करू. आम्ही स्वत: रस्त्यावर उभारू. एकजुटीने उभारू.
आयुक्त- आताजा ना? कशाला भाषणबाजी करता? आता तुम्ही वसुली करू शकत नाही.
वडवेराव- सणासुदीच्याकाळात पगार थांबवू नका. तुमचे काम आहे आमच्यावर सक्ती करणं, आम्हाला शिक्षा देणं. आता एक कोटी वसूल झाले आहेत साहेब.
आयुक्त- अजिबातनाही. मी शिक्षा दिली नाही. झाले का एक कोटी वसूल? स्पष्ट सांगा झाले का?

कर्मचारी- ८०लाख झाले.
आयुक्त- कशालाखोटं बोलता. एक कोटी सांगता. उगीच काही तरी गप्पा मारू नका. थोड्या वेळापूर्वी आढावा घेतला तेव्हा ५१ ते ७० लाखांपर्यंत आकडा होता.
वडवेराव- आज३० लाख आलेत साहेब.
आयुक्त- साहेब,तुम्हाला काहीतरी खोटे सांगून इथे आणले गेले आहे. उगीच बळी पडू नका. आज मुख्य प्रश्न आहे - पैसे भरल्यास शहराच्या निम्म्या भागातील लाइट आज कट होणार आहे.
कुठून भरायचे इतके पैसे?
वडवेराव- मान्यआहे.
आयुक्त- शहराच्यामुख्य उत्पन्नाचे साधन आणि जी रक्तवाहिनी आहे, तीच जर काम करणार नसेल तर कोठून द्यायचे पैसे? आणि कशासाठी पगार द्यायचे यांना. मी गांभीर्याने घेतले असते तर अर्धे घरी गेले असते. कुठं दहा, एक, दोन, तीन हजारांची वसुली असते काय? महापालिकेत या लोकांनी २०११ पर्यंत एक असेसमेंट केले नाही. कशाला ठेवले आहे यांना इथं?
आयुक्त- एककोटी आणल्याचे दाखवा, त्या मिनिटाला पगार देतो. मी कालही म्हणलो आहे.
बातम्या आणखी आहेत...