आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LED Lighting Will Increase The Height Of The City's Beauty

एलईडीच्या रोषणाईने शहराच्या सौंदर्याचीच उंची वाढेल, अभियंत्याना आहे विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पर्यटन महामंडळाने श्री सिध्देश्वर मंदिर भुईकोट किल्ला तटबंदी परिसराला एलईडी दिव्यांंच्या माध्यमातून उजळून टाकण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे. मंदिर किल्ला तटबंदी परिसराचे काम लवकरच पूर्ण होईल. ‘दिव्य मराठी’ने चाचणीवेळी टिपलेले छायाचित्रातून दिव्यांच्या सुशोभीकरणाचा अंदाज येतो, तरी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. िकल्ल्याचे प्रतिबिंब उमटेल तेव्हा पाहा’ अशी उस्त्फूर्त प्रतिक्रिया बजाज कंपनीचे अभियंता या प्रकल्पाचे व्यवस्थापक रोहन कुमार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

‘दिव्य मराठी’ने एलईडी दिव्यांनी उजळणाऱ्या सिध्देश्वर मंदिराचे छायाचित्र ‘जागतिक छायाचित्र दिना’चे औचित्य साधून बुधवारी वाचकांपर्यंत पोहोचवले. अनेक वाचकांनी ‘सुवर्ण सिध्देश्वर’ संकल्पनेला यानिमित्ताने मूर्तस्वरूप येत असल्याचा भावही प्रतिक्रियाच्या माध्यमातून व्यक्त केला. मध्यंतरी किल्ल्याभोवती लायटिंगसाठी करण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या काही विनाशक प्रव़ृत्तीच्या लोकांकडून तोडण्यात आल्या होत्या. यामुळे त्यात एलईडी दिवे लावावेत का नाही? यावर चर्चा सुरू होती. परंतु नुकत्याच झालेल्या मंदिर समिती आणि महामंडळाच्या बैठकीत हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. हाय व्हाल्टेजच्या जवळपास ६० दिव्यांनी किल्ल्याचा परिसर उजळून निघणार आहे.

शहर सौंदर्यकरणासाठी सहकार्य करा
आम्ही कंपनीच्या माध्यमातून देशभरात बरीच कामे केली आहेत. परंतु सोलापूरसारखा नयनरम्य परिसर आम्हास पाहण्यास मिळाला नाही. १८० कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आम्ही हे काम करत आहोत. पण अज्ञातांकडून झालेला मोडतोड, विद्रूपीकरण हा प्रकार खटकला. एलईडी दिवे इतके प्रखर आहेत की रात्रीही किल्ल्याचे प्रतिबिंब तलावात पडेल अशी योजना आहे. आम्हाला सहाकार्य करा. रोहनकुमार, अभियंता बजाज कंपनी

प्रकल्पासाठी ३.५ कोटी : शासनाच्यापर्यटन विकास महामंडळाकडून किल्ला तटबंदीवरील एलईडी विद्युत रोषणाईसाठी कोटी तर मंदिर परिसरासाठी १.५ कोटी असे ३.५ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध झालेले आहे. या निधीतून रोषणाचे काम सुरू आहे.