आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेसाठी पुन्हा दीपक साळुंखे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या आठ जागांपैकी सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष एकत्रित लढणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली. सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक साळुंखे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील दोनपैकी एका जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. संख्याबळ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक २७ डिसेंबरला होईल. सात जागांपैकी मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, नागपूर या जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे, तर सोलापूर, अहमदनगर, बुलडाणा या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन जागांपैकी सोलापूर मतदारसंघातून उर्वरित.पान १२
दीपकसाळुंखे, तर अहमदनगरमधून अरुणकाका जगताप यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली. बुलडाणा मतदारसंघाची उमेदवारी मंगळवारी जाहीर केली जाणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. मुंबईतून विद्यमान आमदार भाई जगताप यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. आघाडीचे उमेदवार असे : भाई जगताप-काँग्रेस (मुंबई), रामदास कदम- शिवसेना (मुंबई), राजेंद्र मुळक काँग्रेस (नागपूर), दीपक साळुंखे राष्ट्रवादी (सोलापूर), अरुण जगताप- अपक्ष (अहमदनगर) सध्या राष्ट्रवादी, अमरीश पटेल काँग्रेस (धुळे-नंदुरबार), महादेवराव महाडिक काँग्रेस (कोल्हापूर), गोपीकिशन बाजोरिया- शिवसेना (अकोला बुलडाणा) या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी राजकीय चुरस वाढत आहे.

मी पक्षाचा निष्ठावंत : दिलीप माने
विधानपरिषदेसाठीउमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्न करीत होतो. पण, आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा ती मिळाली. दोन्ही काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलेत, ही चांगली सुरवात आहे. सोलापूरच्या जागेमुळे आघाडीत बिघाडी होऊ नये अशी माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची इच्छा आहे. मी इच्छुक आहे. पण, उमेदवारी जागा वाटपाबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलेला निर्णय आम्हाला मान्य असून आघाडीचा धर्म पाळणार आहे. (कै.) ब्रह्मदेवदादा माने हेही शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसबरोबर निष्ठावंत राहिले. तोच आदर्श माझाही असेल.

काँग्रेसची तयारी व्यर्थ...
विधानपरिषदेची सोलापूरची जागा काँग्रेसला जागा मिळाली पाहिजे, मित्रपक्षाने माघार घेतलीच पाहिजे, अन्यथा स्वबळावर लढू, अशी रोखठोक भूमिका पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हास्तरीय बैठकीत घेतली होती. विधानपरिषदेसाठी काँग्रेसने स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली होती. शहर जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसला जागा मिळावी, यासाठी प्रदेशपातळीवर शर्थीचे प्रयत्न केल्याचे दिसलेच नाही. आघाडीच्या जागावाटपातील चर्चेदरम्यान सोलापूरची जागा काँग्रेससाठी सोडवून घ्यायची की वाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच स्थानिक नेत्यांमधील मतभेदाचा तिढा सोडवायचा? असा पेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपुढे निर्माण झाला असणार. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोलापूर काँग्रेसच लढवेल, राष्ट्रवादीबरोबरची अाघाडी अगोदरच तुटली अाहे, असे विधान केले होते.
बातम्या आणखी आहेत...