आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साळुंखेंनी अर्ज भरला अन् दिलीप मानेंनी अर्ज घेतला, भाजप-सेनेकडून परिचारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी विद्यमान आमदार दीपक साळुंखे यांनी तर बार्शीचे विजय राऊत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, माजी आमदार दिलीप माने, सिद्रामप्पा पाटील, प्रशांत परिचारक, प्रा. तानाजी सावंत यांनी अर्ज घेतले आहेत. मंगळवारपर्यंत ४२ जणांनी ७२ उमेदवारी अर्ज घेतले असून बुधवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयापासून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत खासदार विजयसिंह मोहिते, आमदार बबनराव शिंदे, दिलीप सोपल, रणजितसिंह माेहिते, राजन पाटील सहभागी झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. भाजपने पंढरपूरच्या प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिल्याचे सूत्रांकडून कळते.
शिक्षण - बीए, जंगम मालमत्ता - स्वत:च्यानावे २७ लाख १३ हजार तर पत्नी रूपमतीच्या नावे २१ लाख ६६ हजार, मुक्ताई, कृष्णाई यश या मुलाच्या नावे २५ लाख २५ हजार रुपयाची जंगम मालमत्ता आहे. स्वत:च्या नावे कोटी ३२ लाख ५५ हजार रुपये, पत्नीच्या नावे कोटी ४८ लाख ५२ हजार तर मुलगा यशच्या नावे दीड कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्वत: साळुंखे-पाटील यांना कोटी लाख १४ हजार तर पत्नी रूपमती यांना लाख १४ हजार रुपये तर मुलगा यश यास लाख हजार असे एकूण कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज आहे.
पंढरपूर विधानपरिषदेसाठी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक बुधवारी (िद. ९) भाजप-शिवसेना पुरस्कृत म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युतीच्या जागावाटपात सोलापूरची जागा भाजपच्या वाट्याला आली. आघाडीला टक्कर देणारा तगडा उमेदवार भाजपकडे नसल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपने परिचारकांना पुढे केले आहे. गेल्या निवडणुकीत साळुंखे यांच्या उमेदवारीसाठी माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी पुढाकार घेतला होता. आता राष्ट्रवादीच्या साळुंखे यांना पुतण्यासाठी खुद्द परिचारकांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.
विजय विठ्ठल राऊत
विजय राऊत यांचे शिक्षण बीए आहे.त्यांच्या नावे कोटी ८५ लाख ३६ हजार रुपये, पत्नीच्या नावे लाख ६० हजार तर मुलांच्या लाख २३ हजार रुपये जंगम मालमत्ता आहे. स्वत:कडे कोटी १० लाख ८२ हजार तर पत्नीकडे ५२ लाख ४२ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. विजय राऊत यांना कोटी लाख रुपये बँकेचे कर्ज आहे.

नगराध्यक्षा दत्तू यांचे नाव यादीत घेण्याचे आदेश
विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या मतदार यादीतून रद्द केलेले मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा मुरलीधर दत्तू यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. नगराध्यक्षा दत्तू यांचे पती मुरलीधर दत्तू हे ठेकेदार आहेत. यापूर्वी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

म्हेत्रे, माने यांची गैरहजेरी
आघाडीचे उमेदवार साळुंखे यांच्यासोबत अर्ज भरताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वगळता इतर प्रमुख नेते गैरहजर होते. साळुंखे यांनी अर्ज भरल्यानंतर काही वेळाने दिलीप माने यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्यात आला. माने यांनी बुधवारी अर्ज भरल्यास अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

सर्वच पक्षात परिचारकांना मानणारी मंडळी
माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे जिल्ह्यातील सर्व पक्षांतील वरिष्ठ नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळे काँग्रेसमधील अनेक जण नाराज आहेत. त्याचा प्रशांत परिचारक यांना मोठा फायदा होऊ शकतो.
विधान परिषदेसाठीभाजप - शिवसेनेने मला पुरस्कृत केले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.'' प्रशांत परिचारक, अध्यक्ष,जिल्हा दूध संघ
आतापर्यंतच्या माझ्या कामाची पोचपावती
राष्ट्रवादीचेपक्षप्रमुख शरद पवार माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीकडून पुन्हा एकदा संधी दिली. आजपर्यंतच्या कामाची ही पोचपावती आहे. आघाडीने उमेदवारी दिल्याने विजयाची खात्री आहे.'' दीपक साळुंखे, आमदार

यांनी घेतले अर्ज....
तानाजीरावसावंत, सोमनाथ वाघमाडे, राहुल सावंत, अतुल इटकर, प्रशांतराव परिचारक, मधुकर जाधव, अशोक ढोले, शिवानंद पाटील, सिद्रामप्पा पाटील, दिलीप माने, सर्जेराव मदने.
मुख्यमंत्री फडणवीस

यांनी केले होते सुतोवाच
राज्याचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिचारक कुटुंबीयांचे संबंध सर्वश्रुत आहेत. मुख्यमंत्री आषाढी महापूजेसाठी आले तेव्हा परिचारकांनी पंतनगर येथे खास त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी फडणवीस यांनी तुम्हाला फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे म्हटले होते.
उमेदवारी अर्ज भरताना दीपक साळुंखे यांच्यासोबत खासदार विजयसिंह मोहिते, आमदार बबनराव शिंदे, दिलीप सोपल, राजन पाटील आदी मान्यवर.
बातम्या आणखी आहेत...