आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमधील बंडखोरी शमली; माने, राऊत यांनी घेतली माघार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार, माजी आमदार दिलीप माने यांनी उमदेवारी मागे घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितल्याने अर्ज मागे घेत असल्याचे श्री. माने यांनी स्पष्ट केले. अर्ज भरून आणि मागे घेऊन माने यांनी नेमके काय साधले हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, विजय राऊत यांनीही माघार घेतली.

विधानपरिषदेच्या निमित्ताने सुरवातीपासून काँग्रेसने जागेवर दावा केला. पण, जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वी इच्छुकांची संख्या वाढल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून तेढ निर्माण झाली. पक्षासाठी जागा सोडवून घेण्याऐवजी जिल्हाध्यक्षांसह नेतेमंडळींनी उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहिले. ‘स्थानिक पातळीवर गोंधळ अन्् प्रदेशपातळीवर मौन’ अशी काँग्रेसची भूमिका होती.
सोलापूर। जिल्हामध्यवर्ती बँक विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया एकाच कालवधीत आल्याने दोन्हीचा एकमेकांवर थोडाफार परिणाम दिसून आला. जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत अर्ज माघार घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना विनवण्या करण्यात आल्या तर विधानपरिषद निवडणुकीत स्वत:हून अर्ज काढून घेतले.

दीपकसाळुंखे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असल्याने माझाच विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. प्रशांत परिचारक हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच असल्याने आतून राष्ट्रवादीकडून मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेऊन आहेत. यामुळे महायुती पुरस्कृत उमेदवार परिचारक यांना काँग्रेस राष्ट्रवादीची मते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विजयी खेळाडू सर्वात आधी
दिलीप माने यांनी अर्ज दाखल केल्यानंतर विजयी खेळाडू हा सर्वात शेवटी येत असल्याचे सांगितले होते. मात्र अर्ज माघारदिवशी श्री. माने यांनी सर्वात आधी येऊन ११ वाजून १० मिनिटांनी अर्ज माघारी घेतला आणि निघूनही गेले. अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या काही मिनिट अगोदर अर्ज दाखल करणारे माने यांनी शनिवारी सर्वात अाधी अर्ज काढून घेतला.

काँग्रेसची अाज बैठक
विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात रविवारी दुपारी चारला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजिली आहे. माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती नगरपालिका सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी केले.
आकडा गाठणे युतीला कठीण
विधानपरिषद निवडणुकीत संख्याबळ पाहता आघाडीचे पारडे जड आहे. मागील पाच वर्षांत आमदार दीपक साळुंखेे यांनी काँग्रेस नगरसेवकांना आमदार निधी दिला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी अंतर्गत नाराजी अाहे. भाजपमध्येही नाराजी उफाळून अाहे.

काहीजणांनीबंडखोरीचा पवित्रा घेतला अाहे. शिवसेना युतीचा धर्म पाळणार असल्याचे संकेत दिले अाहेत. मागील विधान परिषद निवडणुकीत भाजपची वाताहत झाली. त्यामुळे रामचंद्र जन्नू यांना पक्षाचीही मते मिळाले नाहीत. हे अनुभव पाहता भाजपला यंदा मोठी खबरदारी घेत ही िनवडणूक लढवावी लागणार अाहे.
शिवसेनेची ४४ मते असल्याने त्यांच्याकडून युतीचे धर्म पाळले तरी परिचारकांना १०० मताचा फरक पडतो. पंढरपुरात परिचारक, करमाळा, माढ्यातील स्वाभीमानीचे संजय शिंदे, सोलापुरात महेश कोठे यांनी फोडाफोडीचे राजकारण केले तरी ३० ते ४० मताचे अंतर राहणार अाहेच. ते जमविण्याचे कसब परिचारकांना जमेल का? यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून अाहे.

म्हेत्रे भोवती राजकारण
अक्कलकोट तालुक्यात अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या तीन नगरपरिषद मधील ४५ मतदार आहेत. या तीन नगरपालिका म्हेत्रे यांच्यात ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत म्हेत्रे यांना परिचारकांनी मदत करीत सत्ताधारी गटात घेतले असले तरी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची उमेदवारी राहिल्याने िनवडणुका होत आहेत. त्यामुळे म्हेत्रे भाजपावर नाराज असू शकतात.

पालकमंत्र्यांना डोकेदुखी
शहरातील भाजपा अंतर्गत राजकारण पालकमंत्री विजय देशमुख यांना भोवण्याची शक्यता आहे. शहर पदाधिकारी निवड, महापालिका विरोधीपक्षनेता निवड, शासकीय नियुक्ती आदी कारणामुळे नगरसेवक सुरेश पाटील, मोहिनी पत्की, नागेश वल्याळसह आठ नगरसेवकांचे गट नेहमी पालकमंत्र्यांना डोकेदुखी ठरू शकते. हा वाद पक्षीय पातळीवर पोहच नाही आणि पोहचले तर वरिष्ठाकडून सोडवले जात नाही हे विशेष.

आज भाजप नगरसेवकांची बैठक
सहकारमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत. रविवारी दुपारी त्रिपुरसुदंरी हाॅटेल येथे नगरसेवकांची बैठक हाेणार आहे. त्यात ते विधान परिषद निवडणुकीच्या बाबतीत नगरसेवकांशी ते संवाद साधणार आहेत अशी माहिती शहरध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.

प्रदेशाध्यक्षांशी बोलणे झाले
^प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत सांगितले. दोन्ही मित्रपक्षांची आघाडी असून तुमच्या उमेदवारीमुळे चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाचा सन्मान राखून उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये कार्य करणार.” दिलीपमाने, माजी आमदार

दोघांनीअर्ज मागे घेतले
^दिलीप माने विजय राऊत यांच्या उमदेवारीबाबत स्थानिक पातळीवर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी माजी आमदार मानेंशी चर्चा केली. मी राऊत यांच्याशी बोलून त्यांना अर्ज मागे घेण्यास कळविले. दोघांनी उमेदवारी मागे घेत आघाडीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.” संतोष पाटील, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस
बातम्या आणखी आहेत...