आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी ‘विधानसभे’तील गद्दारांवर कारवाई करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणूक बैठकीला उपस्थित नसलेल्या सात नगरसेवकांना नोटीस बजावत तीन दिवसांत खुलासा मागितला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नगरसेवक शिवानंद पाटील यांच्यासह पाच नगरसेवकांवर आधी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका मोहिनी पत्की यांनी केली आहे. नोटीसला उत्तर देणार नाही. कारण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर स्पष्ट केले आहे, असे पत्की म्हणाल्या.

पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तीत पत्कींसह सुरेश पाटील, रोहिणी तडवळकर, नागेश वल्याळ, पांडुरंग दिड्डी आदी गैरहजर होते. शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी नोटीस दिली.
पत्की म्हणाल्या की, विधानसभा निवडणूक वेळी नगरसेवक शिवानंद पाटील यांच्या घरात बैठक घेऊन माझ्या विरोधात भूमिका घेतली. बैठकीसाठी आम्हाला निरोप वेळेवर दिला नाही. महापालिका विरोधी पक्षनेत्याची निवड शहराध्यक्ष करत नाहीत. महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची निवड केली नाही. आम्ही युतीचे उमेदवार प्रशांत परिचारक यांच्या बाजूने राहणार आहोत. यावेळी नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्याळ, रोहिणी तडवळकर, देवा अंजिखाने, राम तडवळकर आदी उपस्थित होते.

याबाबत बोलणार नाही
^पक्षनेतृत्त्वाने दिलेल्या आदेशाचे पालन केले. याविषयी प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार नाही. हा विषयही नाही प्रा. अशोक निंबर्गी, भाजप,शहराध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...