आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Legislature Elections 27 December Ready To Political Party

भाजपचा दोनवेळा पराभव, सेना बाशिंग बांधण्यास तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; विधानपरिषद निवडणूक २७ डिसेंबर रोजी होत असून, त्यासाठी दोन ते नऊ डिसेंबर कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असली तरी केंद्र राज्यात सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना महायुतीमधील हालचाली मंद आहेत. दरम्यान, जिल्ह्यात भाजपपेक्षा अधिक मतदार सलगर दोनदा भाजपला पराभव चाखावा लागल्याने ही जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक नेते करू लागले आहेत.
विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, काँग्रेसकडून माजी आमदार िदलीप माने, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून विद्यमान अामदार दीपक साळुंके पुन्हा इच्छुक आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप शिवसेना यांच्यात युती आहे. युतीच्या कोट्यात सोलापुरातील जागा भाजपकडे आहे.

मागील विधान परिषद निवडणुकीत भाजपचे रामचंद्र जन्नू उमेदवार होते. मात्र, पक्षातील मते त्यांना मिळाली नाहीत. घोडेबाजार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे शहरात भाजपकडून कोणी इच्छुक नाहीत. जिल्ह्यातून दोन नावे आहेत. त्यामुळे यंदा युतीकडून कोण याची चर्चा आहे.

नगरसेवकांचीइच्छा निवडणुकीची
विधानपरिषदेसाठी पक्षीय बलाबल पाहता आघाडीचे पारडे जड आहे. सोलापूर विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर झाल्यास काँग्रेसकडून बंडखोरी होण्याची शक्यता अाहे. तसे झाल्यास युतीच्या नगरसेवकांना महत्त्व येणार आहे. शिवाय घोडेबजार रंगणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची इच्छा निवडणुकीची आहे.
यानेत्यांना येणार महत्त्व : सेनेचेमहेश कोठे यांच्याकडे काँग्रेसची मते फिरवण्याची ताकद आहे. शिवाय भाजपमधील गटबाजी पाहता आठ नगरसेवकांना महत्त्व येणार आहे.

शिवसेनेकडून होतेय जागेची मागणी
चंद्रकांत मिराखोर सोलापूर
विधानपरिषद निवडणूक २७ डिसेंबर रोजी होत असून, त्यासाठी दोन ते नऊ डिसेंबर कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असली तरी केंद्र राज्यात सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना महायुतीमधील हालचाली मंद आहेत. दरम्यान, जिल्ह्यात भाजपपेक्षा अधिक मतदार सलगर दोनदा भाजपला पराभव चाखावा लागल्याने ही जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक नेते करू लागले आहेत.

विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, काँग्रेसकडून माजी आमदार िदलीप माने, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून विद्यमान अामदार दीपक साळुंके पुन्हा इच्छुक आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप शिवसेना यांच्यात युती आहे. युतीच्या कोट्यात सोलापुरातील जागा भाजपकडे आहे.

मागील विधान परिषद निवडणुकीत भाजपचे रामचंद्र जन्नू उमेदवार होते. मात्र, पक्षातील मते त्यांना मिळाली नाहीत. घोडेबाजार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे शहरात भाजपकडून कोणी इच्छुक नाहीत. जिल्ह्यातून दोन नावे आहेत. त्यामुळे यंदा युतीकडून कोण याची चर्चा आहे.

नगरसेवकांचीइच्छा निवडणुकीची
विधानपरिषदेसाठी पक्षीय बलाबल पाहता आघाडीचे पारडे जड आहे. सोलापूर विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर झाल्यास काँग्रेसकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास युतीच्या नगरसेवकांना महत्त्व येणार आहे. शिवाय घोडेबजार रंगणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची इच्छा निवडणुकीची आहे.
यानेत्यांना येणार महत्त्व : सेनेचेमहेश कोठे यांच्याकडे काँग्रेसची मते फिरवण्याची ताकद आहे. शिवाय भाजपमधील गटबाजी पाहता आठ नगरसेवकांना महत्त्व येणार आहे.

उमेदवार आणि मतदारांचेही फोटो
निवडणूकआयोगाच्या आदेशानुसार विधान परिषद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे मतपत्रिकेवर फोटो घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज दाखल करतानाच तीन फोटो द्यावे लागणार आहेत. शिवाय मतदार असलेले जिल्हा परिषद, महानगरपालिका नगरपालिकेच्या सदस्यांचे फोटो मतदार यादीमध्ये असणार आहेत. यंदा प्रथमच उमेदवार आणि मतदारांचे फोटो बंधनकारक केले आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले.

उमेदवारीसाठी चर्चेतील नावे
हर्षवर्धन पाटील, दिलीप माने, संतोष पाटील (काँग्रेस), दीपक साळुंके (राष्ट्रवादी), प्रशांत परिचारक, संजय शिंदे (महायुती) (ऐनवेळी अन्य नावे येऊ शकतात.).

जागेची मागणी करणार
युतीअंतर्गतसोलापूरविधान परिषदेची जागा भाजपकडे आहे. या जागेवर सलग दोन वेळा भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. सेनेचे मतदार अधिक अाहेत. त्यामुळे जागा मागणार आहोत. कोणीही लढले तरी युतीकडून विधान परिषद निवडणूक लढवली जाईल.” महेश कोठे, शिवसेनाजिल्हा प्रमुख

विधानपरिषदसाठी प्रदेश पातळीवर चर्चा होणार आहे. शहरातून अद्याप कोणही उमेदवारी मागितली नाही. जिल्हातून कोण मागणी केली याची माहिती नाही. जिल्हाध्यक्षांना माहीत असेल” प्रा. अशोक निंबर्गी, शहर भाजप अध्यक्ष
महायुतीची मतदार संख्या
एकूण 103
शिवसेना 53
भाजप 38
इतर घटक पक्ष12
आघाडीची मतदार संख्या
एकूण 243
राष्ट्रवादी 130
काँग्रेस 113