आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंग-रेषेतील हे दोघे, अकादमीत देणार चित्रकलेचे धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दोघेही युवा चित्रकार. दोघांकडे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर तोडीस तोड अशी कला. मुंबईसारख्या ठिकाणी राहून कोट्यवधी रुपये कमावले असते. परंतु सोलापूरकरांनाच कलेचे धडे देण्याचे ठरवले. त्यातूनच ‘लिआेनार्दो आर्ट अकॅडमी’ स्थापन केली. त्याचे रविवारी उद््घाटन होत आहे.

पुष्कराज गोरंटला आणि दयानंद पटणे असे हे युवा कलावंत. सोलापूर आणि सांगलीत चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले. पुष्कराज पुढे मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये गेला. बीएफए (बॅचलर ऑफ आर्टस्) पूर्ण केली. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांच्या संपर्कात आला. अनेक चित्रे चितारत त्यांची प्रदर्शने भरवली. पटणे हे ‘क्लासिकल अॅनिमेशन’ अभ्यासक्रम पूर्ण करून सोलापूर, पुणे, बंगळुरू इथे प्रदर्शने भरवली. स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले.

सोलापूरकरांना देण्यासाठी
कलेच्या या प्रवासात साेलापूरच्या नवोदितांसाठी काही तरी करण्याची इच्छा बळावली. त्यातूनच आर्ट अकॅडमी काढण्याचे ठरवले. शालेय जीवनातील अनेक कलावंत दिसून येतात. परंतु त्यांना पुढे जाता येत नाही. अनेक कलावंत पुण्या, मुंबईत जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत. राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शने त्यांना पाहता येत नाही. अशा चित्रप्रेमींसाठी लिआेनार्दोचे दालन खुले होत आहे.
केवळ कला नाही, पुस्तकेही
या नव्या कलादालनात राष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांचे मार्गदर्शन मिळेल. कार्यशाळा होतील. प्रात्यक्षिके दाखवली जातील. शास्त्रोक्त ज्ञानही दिले जाईल. केवळ प्रात्यक्षिकांतून कला समृद्ध हाेत नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांची पुस्तकेही ठेवण्यात आली आहेत. कलेच्या ज्ञानाला हे बौद्धिक खाद्य पूरक आणि प्रगल्भ करेल, असा विश्वास या युवा चित्रकारांनी व्यक्त केला.

अनेक क्षेत्रे खुली होणार
रंग-रेषांच्या या दुनियेत चित्रकारांना हक्काचा कॅनव्हास मिळणारच. त्याशिवाय त्यांना एक चांगले भविष्यही मिळेल. अॅनिमेशन, चित्रपट, कला दिग्दर्शक, कलानिर्मिती, जाहिरात संस्था, वास्तुरचना, इंटिरियर डिझाइन, टेक्स्टाइल डिझाइन अशा अनेक क्षेत्रात संधी मिळणार आहे. स्वतंत्र चित्रकार म्हणून स्वत:च अस्तित्वही सिद्ध करू शकतील, असा विश्वास गोरंटला आणि पटणे यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...