आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौघांना जन्मठेप; सहा जणांना सक्तमजुरी; जंगलगी येथील चौगुले खून प्रकरणात कोर्टाचा निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- तालुक्यातील जंगलगी येथे जलस्वराज योजनेतील गैरव्यवहार आणि ग्रामपंचायत निवडणुकीवरून २६ मार्च २०१० मध्ये दोन गटात एकाचा खून झाला होता. त्याचबरोबर एकाचे हात तोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात चार आरोपींना जन्मठेपेची आणि हात तोडणाऱ्या सहा आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुरुवारी पंढरपूर न्यायालयाचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली. २०१० मध्ये अवघ्या एका तासाच्या अंतराने या दोन घटना घडल्या होत्या. दोन्ही बाजूचे आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून राजकीय ईर्षेपोटी हे गुन्हे घडले होते. 


या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी
मार्च २०१० मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवरून गावातील दोन गटात मारामारी झाली होती. यामध्ये सिद्धनाथ चौगुले यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी सोमलिंग बिराजदार, निगोंडा बिराजदार, अवधूत बिराजदार आणि श्रीकांत चोखंडे या चौघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारासह वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. उर्वरितपान १२ 
सदरच्यागुन्ह्यात आठ आरोपी होते. यापैकी चार आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. आनंद कुर्डुकर यांनी काम पाहिले. 


खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात १३ आरोपींवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. अंतिम सुनावणीत १३ पैकी आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ठोठावली. सात जणांना सबळ पुरावा नसल्याने निर्दोष मुक्त केले आहे . 


हात तोडणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा 
जलस्वराजयोजनेच्या गैरव्यवहाराची बातमी वृत्तपत्रात कोणी दिली, यावरून आरोपींनी फिर्यादी राजकुमार बिराजदार यांचे जाडर बोबलाद (ता. जत.) शिवारात दोन हात तोडले. शरीरावर तलवारीने वार केले. डॉक्टर, जखमी पोलिसांची साक्ष महत्त्वाची ठरली. १३ आरोपींपैकी मलाप्पा तेलगाव, महासिद्ध चौगुले, गुणाप्पा चौगुले, महादेव चौगुले, सुरेश तेलगाव आणि आण्णाप्पा तेलगाव यांना दोषी धरत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. महासिद्ध चौगुले आणि गुणाप्पा चौगुले यांना पाच वर्षे सक्तमजुरी सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...