आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात आजपासून किरणोत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होय,ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात आज आणि उद्या किरणोत्सव पाहता येणार आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मूर्तीवर विशिष्ट दिवशी सूर्योदयावेळी सूर्यकिरणे पडतात, अगदी तसाच प्रकार हनुमान जयंतीनंतर दोन दिवसांनी (म्हणजे यंदा १३ १४ एप्रिलला) पाहता येणार आहे.
 
प्रतिवर्षी किंवा शेकडो वर्षांपासून हा प्रकार होत असेल. पण इतक्या बारकाईने कोणाचे लक्ष गेले नाही. त्यामुळे हा प्रकार कुणाच्या निदर्शनास आला नसावा. पण सिद्धेश्वर मंदिरातील पुजारी आनंद शिवकुमार हब्बू हे मागील दोन वर्षांपासून निरीक्षण नोंदवत आहेत. त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हब्बू यांनी करून ठेवलेल्या नोंदीनुसार हा किरणोत्सव हनुमान जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो. पहिल्या दिवशी काहीशी किरणेच मूर्तीच्या चेहऱ्यावर पडतात. दुसऱ्या दिवसापासून पूर्ण मूर्तीवर ही सूर्यकिरणे पडतात गर्भगृहात लख्ख प्रकाश होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. सकाळी सव्वा सहा ते साडेसहा या दरम्यान हा किरणोत्सव होणार आहे. काहीच्या मते हा प्रकार रोजच घडतो, पण बहुधा तसे नसल्याचे हब्बू परिवाराने सांगितले.
 
महालक्ष्मी, गणपतीपुळे हत्तरसंगकुडल
कोल्हापूरला जानेवारी महिन्याच्या शेवटी अथवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला तसेच नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन काळात हा किरणोत्सव सोहळा असतो. तसेच गणपतीपुळे येथील गणपती मंदिरात रोज सायंकाळी सूर्यास्तावेळी श्रीगणेशाच्या बरोबर नाभीवर ही सूर्यकिरणे पडतात. तसेच हत्तरसंगकुडल येथील श्री संगमेश्वर मंदिरातही दर गुढीपाडव्याला शिवलिंगावर सूर्यकिरणे पडतात.
 
खगोलशास्त्र वास्तुशास्त्र
पूर्वीची वास्तू रचनाही खगोलीय गोष्टींचा अभ्यास करून केलेली होती. एव्हाना कोणार्कचे सूर्यमंदिर हे याचे खूप चांगले उदाहरण आहे. येथे प्रतिदिनी किरणोत्सव असतो. तसेच या सूर्यरथाची चाके आणि त्याच्या आऱ्या या प्रत्येक घटिका तासाचे प्रमाण आहे. एक आरी म्हणजे एक तास असे प्रमाण आहे. सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिरातील किरणोत्सव हा दुर्मीळच योग म्हणावा लागेल.
- प्रा.डॉ. माया पाटील, पुरातत्त्व विभाग प्रमुख, सोलापूर विद्यापीठ
 
बातम्या आणखी आहेत...