आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठास श्री सिद्धेश्वर नाव देण्यासाठी लिंगायतांचा मोर्चा, तावडेंवर फेकला भंडारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर विद्यापीठास बसवेश्वरांचे नाव देण्यासाठी लिंगायत समाज रस्त्यावर उतरला. - Divya Marathi
सोलापूर विद्यापीठास बसवेश्वरांचे नाव देण्यासाठी लिंगायत समाज रस्त्यावर उतरला.
सोलापूर- सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वीरशैव व्हीजन, शिवा संघटना यांच्यासह काही संघटनांनी यात सहभाग घेतला. सकाळी अकराला महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून सुरुवात झाली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर होम मैदानावर जाहीर सभा झाली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ, अशी भ्रामक आशा दाखवून ही अफूची गोळी त्यांना देण्यात येत असल्याचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर प्रा. धोंडे म्हणाले. सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले, आम्ही राजकारण विरहीत काम करीत आहोत. काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. 
 
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळत चालला आहे. मागील महिन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. आता लिंगायत समाज सोमवारी रस्त्यावर उतरला. सोलापूर विद्यापीठास श्री सिद्धेश्वर विद्यापीठ असे नाव दिले जावे अशी मागणी शिवा संघटनेची आहे. या मोर्चाला पालकमंत्री व लिंगायत समाजाचे नेते विजयकुमार देशमुख यांनी दांडी मारली. मात्र त्यांचे नगरसेवक पुत्र किरण देशमुख सहभागी झाले आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या अंगावर धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी भंडारा फेकून निषेध केला. या सर्व घटनेमागे शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह स्थानिक भाजप नेते राजकारण करत असल्याचे सांगत धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी तावडेंवर भंडारा फेकला.
 
सोलापूर विद्यापीठाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 4 जून 2004 यादिवशी केली होती. यानंतर विद्यापीठाला सर्वप्रथम अहिल्यादेवींचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली. पुढे पुणे विद्यापाठीला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिल्यानंतर सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय पेटला. आता या या विद्यापीठास अहिल्यादेवी, श्री सिद्धेश्‍वर किंवा महात्मा बसवेश्‍वर यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. यामागे राजकीय कारणासोबत जातीय कारणही मानले जाते.
सोलापूरच्या पूर्व भागात लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे तर सोलापूरच्या पश्चिम व ग्रामीण भागात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. मात्र, आता नव्या घडामोडीमुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारसह भाजप सरकारने सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवींचे नाव देण्याबाबत सहमती दर्शिवली होती. मात्र, मागील काही दिवसापासून विद्यापीठ नामांतरावरून राजकारण शिजत आहे. विशेष म्हणजे, भाजपनेच हे राजकारण उखरून काढल्याचे बोलले जात आहे. लिंगायत व धनगर समाज भाजपची व्होट बॅंक असतानाही त्यांच्यात तेढ निर्माण होईल असे कृत्य भाजपकडून का केले जात आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.  
 
विनोद तावडेंवर भंडारा फेकला-
 
सोलापूर दौ-यावर असलेले शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर विद्यापीठ नामांतर विषयावरून धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी निवेदन देत भंडारा फेकला. शिक्षणमंत्री यांनी भाषण करण्यास सुरुवात करताच अहिल्यादेवी होळकर विद्यापीठास नावे द्यावे, या मागणीचे निवेदन व भंडारा काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर टाकला. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत घोषणा दिल्या. त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढले. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्यांनी त्यांच्याकडे आलेल्या नावाची शिफारशी शासनाकडे केली आहे. त्यानुसार शासन स्तरावर योग्य पध्दतीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिली.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, यासंबंधित माहिती व फोटोज....
बातम्या आणखी आहेत...