आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: मद्य विक्री परवाना देणे सुरू; पहिल्याच दिवशी 63 अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर,नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील दारू दुकाने तत्काळ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले. २०१७-१८ साठी मद्य विक्री परवान्याचे नूतनीकरण केलेल्यांची दारू दुकाने तत्काळ सुरू होतील, हा निर्णय येताच गुरुवारी शहर-जिल्ह्यातील ६३ जणांनी अर्ज केला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करत गुरुवारी दिवसअखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४० जणांना दारू दुकाने सुरू करण्याचे परवाने दिले. 
 
महामार्गावरील ५०० मीटर अंतरातील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्च २०१७ ला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने महामार्गावरील दारू दुकानांचे परवाने रद्द केले होते. त्यात शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दुकानांचाही समावेश होता. यामध्ये सोलापूर शहर उर्वरितपान 
 
उच्च न्यायालयाच्याआदेशानंतर ज्या दारू विक्रेत्यांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला अशांच्या कागदपत्रांची पडताळणी करून गुरुवारी दिवसअखेरपर्यंत ४० जणांना परवाने दिले. शहर-जिल्ह्यात बंद असलेली २४६ दारू दुकाने हाेती. जे नूतनीकरणासाठी अर्ज करतील त्यांना परवाने दिले जातील. 
- रवींद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर
 
शहर हद्दीतील दुकाने उघडण्यास परवानगी 
शासन आदेशानुसार शहर, नगरपालिका हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसे आदेश राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक यांना दिले आहेत. जिल्ह्यात नगरपालिका हद्दीत २४६ मद्यविक्री दुकाने आहेत. महापालिका हद्दीतील दुकाने सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. - राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी 
 
बातम्या आणखी आहेत...