आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Listen Adavani, Ajit Pawar Asked Tawade, Pankaja Munde

विराेधकांचे साेडा किमान अडवाणींचे तरी एेका? पवारांचा तावडे, पंकजांना टाेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘विराेधी पक्षाचे साेडा, किमान पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचे ऐकून तरी पदांचे राजीनामे द्या,’ असा टाेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी साेमवारी भाजपमधील वादग्रस्त मंत्र्यांना लगावला. पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘विरोधक टीका करतच असतात. पण भाजप नेत्यांचे घोटाळे पाहता विनाेद तावडे व पंकजा मुंडे यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे एेकून तरी राजीनामे द्यावेत. दिल्लीत ‘आप’च्या नेत्यांचा घोटाळा नुसता समजला तरी त्यांचे राजीनामे घेण्यात आले, तर महाराष्ट्रातील नेत्यांना अभय का?,’ असा सवाल पवारांनी विचारला. मोहोळचे अामदार रमेश कदम समर्थकांनी केलेल्या दगडफेकीबाबत पवार म्हणाले, ‘आमदार कदम नवीन आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. पण चुकीचे वर्तन करणा-यांची गय केली जाणार नाही.

लोकसभा व विधानसभांमधील अपयशामुळे कार्यकर्ता हिरमुसला आहे. त्यासाठी पक्ष बळकटीचे काम सुरू आहे,’ असे त्यांनी नमूद केले.या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे अादींची उपस्थिती हाेती.

पुढे वाचा, 'एमआयएम' पक्ष म्हणजे घातक विष