आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहारा तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - संपूर्ण लोहारा तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी २२ वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना गावे वाटून देण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांचा फोटो काढून नंतर त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.

जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यासाठी वर्षनिहाय उद्दिष्ट ठरवून वैयक्तिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व विभागांना गांभीर्याने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात लोहारा तालुका पूर्ण पाणंदमुक्त करण्याचा आता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी यासाठी विशेष कार्यक्रम तयार केला आहे. सध्या लोहारा तालुक्यात केवळ चार हजार ८७२ वैयक्तिक स्वच्छतागृहांची निर्मिती झाल्यावर पूर्ण तालुका पाणंदमुक्त होणार आहे. यामुळे या तालुक्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक दिवशी काय काम करायचे यासंदर्भात मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. या योजनेनुसार सर्वांना काम करण्यास सांगण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत ठरवण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजना आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता मिशनच्या माध्यमातून संपूर्ण ताकद या उद्दिष्टासाठी लावली जात आहे. लोहारा तालुक्यात ४५ ग्रामपंचायती आहेत. बेसलाइन सर्वेक्षणानुसार यापैकी २३ ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती झाली आहे. येथे काहींनी स्वच्छतागृह बांधल्यानंतर पूर्ण गाव पाणंदमुक्त होण्यास मदत होणार आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये विशेष लक्ष देऊन उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. गाव संपूर्ण पाणंदमुक्त झाल्यावर विशेष सभा घेऊन ठराव घेतला जाईल. हे उद्दिष्ट साध्य झाल्यावर लोहारा तालुका मराठवाडा विभागातील पहिला पाणंदमुक्त तालुका ठरणार आहे. जिल्ह्याला बेसलाइन सर्व्हेनुसार देण्यात आलेले स्वच्छतागृह बांधणीचे उद्दिष्ट या उपक्रमातून पूर्ण होणे अपेक्षित आहेत. यासाठी पूर्ण तयारीनिशी कामकाज करण्यात येणार आहे.

लोहारा तालुका जुलै महिन्यातच पाणंदमुक्त करण्याचे उद्दिष्ट
लोहारा तालुका संपूर्ण पाणंदमुक्त करण्यासाठी या महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी अधिकाऱ्यांना गावे वाटून देण्यात आली आहेत. गांभीर्याने ही मोहीम राबवण्याबाबत सांगण्यात आले आहे. माझे स्वत:चे वैयक्तिक लक्ष या मोहिमेवर असणार आहे.'' सुमनरावत, मुख्य कार्यकारी अधिकारी.

सर्व अभियंते कामाला
तालुकास्तरावरविविध विभागात कार्यरत असलेल्या सर्व अभियंत्यांनाही या कामांसाठी जुंपण्यात आले आहे. त्यांना शोषखड्ड्यांचे मोजमाप करून खोदकाम करून घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गरज भासल्यास शेजारील तालुक्यातून गवंडी आणण्यात येणार आहेत.

फळ्यावरविद्यार्थ्यांची नावे
स्वच्छतागृहबांधकाम करत असलेल्या घरातील विद्यार्थ्यांना शाळेत गुलाबपुष्प देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बांधकाम करत नसलेल्या घरातील विद्यार्थ्यांची नावे त्या वर्गातील फलकावर लिहिण्यात येणार आहेत. बांधकाम करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

स्वच्छतागृहांची डागडुजी
माेहिमेतसार्वजनिक स्वच्छतागृहावरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीला विशेष निधी तरतूद करून किंवा लोकसहभागातून स्वच्छतागृहांची डागडुजी साफसफाई करण्यात येणार आहे. शाळा, अंगणवाड्यांतील स्वच्छतागृहांचीही सफाई होणार आहे. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींचे मेळावे घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. परिसर वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला जाईल.

दाखले देण्यास प्रतिबंध
स्वच्छतागृहनसलेल्या कुटुंबांना ग्रामपंचायतीमार्फत मुंबई पोलिस अधिनियमानुसार नोटीस देण्यात येणार आहे. ग्रामसभेतून अशा कुटुंबांची यादी वाचून दाखवण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतागृह बांधण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्यास ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय अन्य शासकीय कार्यालयातून कोणत्याही प्रकारचे दाखले देण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित कार्यालयप्रमुखांना कडक शब्दांत आदेशित केले आहे.

तृतीयपंथीयांचे पथक
लोहारातालुक्यात तृतीयपंथीयांचे पथक जनजागृतीसाठी मागेच नियुक्त केले आहे. या पथकाने सातत्याने दीड महिना प्रत्येक गावात भेट देऊन जनजागृती केली आहे. पथनाट्य, गीते याच्या माध्यमातून मनोरंजन करून तृतीयपंथीय जनजागृती करत आहेत. या उपक्रमासाठी त्यांचा आणखी मुक्काम तालुक्यात वाढवण्यात आला आहे. त्यांना आणखी कार्यक्रम घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. याचा या विशेष मोहिमेसाठी उपयोग करण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांवर जबाबदारी
जिल्हाग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका, चार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कृषी विकास अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह २१ अधिकाऱ्यांची या विशेष मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना कमी वैयक्तिक स्वच्छतागृहे असलेली २२ गावे नेमून देण्यात आली आहेत. तेथे प्रत्यक्ष जाऊन काम करून वैयक्तिक स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करून घेण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या सर्वांना सीईओ रावत यांनी आदेशित करून हा उपक्रम गांभीर्याने राबवण्याच्या विशेष सूचना दिल्या आहेत.

उघड्यावर बसणाऱ्यांचे छायाचित्र
स्वच्छतागृहांचावापर करता उघड्यावर बसणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र घेण्यात येणार आहे. त्यांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना प्रमुख अधिकाऱ्यांमार्फत स्वच्छतागृह बांधून वापराबाबत तंबी देण्यात येणार आहे.

डिजिटलफलकावर प्रसिद्धी
स्वच्छतागृहाचेबांधकामासाठी नोटीस देऊनही टाळाटाळ हेात असल्यास संबंधित कुटुंबप्रमुखाचे नाव डिजिटल फलकावर लावून त्याची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये संबंधितांचे छायाचित्रही असणार आहे. यामुळे अशांची चांगलीच गोची होणार आहे. फलकावर नाव येणार असल्याने बदनामीच्या भीतीपोटी प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.