आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lokmangal Foundation Collective Marriage Ceremony

‘लोकमंगल’ करणार १५१ जोडप्यांचे मंगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकमंगल फाउंडेशनच्या लोकमंगल सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्यात यंदा १५१ जोडपी रेशीमगाठीत बांधली जाणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे अविनाश महागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी ६.१५ वाजता होणाऱ्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा लाख पाहुणे येतील, असेही ते म्हणाले.

स्वागत कक्ष, कार्यालय, वैद्यकीय सेवा विभाग, रक्तदान विभाग, भांडारगृह, स्वयंपाक गृह, भोजन, साहित्य वाटप, मेकअप, समुपदेशन, विधी सोहळा मंच आदी विभागांची निर्मिती करण्यात आली आहे.

उत्तरोत्तर संख्या वाढवण्यावर भर असल्याची भावना आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यक्रमात लहानगे वारकरी शक्तिप्रदर्शनाचे प्रयोग आणि अतुल्य भारत या सोलापूरच्या विकासाच्या विषयावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रवेशद्वारात किल्ल्यांच्या बुरूजातून प्रवेश, मध्यभागी संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट असणारे भक्ती-शक्तीची प्रतिकृती उभारली जाणार आहे. पत्रकार परिषदेस प्रवीण शेळवणे, शहाजी पवार, सचिन कल्याणशेट्टी, प्रकाश पवार, ऋषिकेश नागावकर उपस्थित होते.

सीसीटीव्हीची नजर
यंदाफाउंडेशनने सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवण्याचे नियोजन केले आहे. फायरब्रिगेड, अॅम्ब्युलन्स असा संकटकालीन विभागही उभा करण्यात आला आहे.

प्रीती भोजनाचा मान आजी-आजोबांना
अक्षतासोहळा झाला की अन्नपूर्णा योजनेचे निराधार असणारे आजी-आजोबा यांना भोजनाचा मान आधी दिला जाणार आहे. रोटरी अन्नपूर्णा योजनेतीलही आजी-आजोबांना यात सामावून घेतले जाणार आहे, असे महागावकर म्हणाले.