आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळाच्या खेळाकडे करिअर म्हणून पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वडील अण्णासाहेब आई सुमंगल दोघेही डॉक्टर. परंतु मी बुद्धिबळात करिअर करण्याचे ठरवले. बुद्धिबळच नाही तर कोणत्याही खेळात अव्वल पातळी गाठत असताना उदयोन्मुख खेळाडूंनी त्या खेळाकडे करिअर म्हणून पाहण्यास काहीच हरकत नाही, असा सल्ला राहुरीचा (नगर) ग्रँडमास्टर शार्दूल गागरे याने दिला.

आंतराराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो सध्या सोलापुरात आला आहे. तो म्हणाला, ‘बुद्धिबळ जगातील सर्व देशात खेळतात. सध्या मी विप्रेनचे प्रशिक्षक अलेक्झांडर गोलोश्चपोव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. हे प्रशिक्षण मी ऑनलाइन घेतो. त्यासाठी मी रोज आठ तास सराव करतो. आठवड्यातून चार तास प्रशिक्षण घेतो. त्यासाठी एका तासाला माझे वडील तीन हजार रुपये मोजतात. वर्षातून दोन वेळा ते राहुरीत येतात. यासाठी राहुरीचे शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया हा खर्च पुरस्कृत करतात. त्यांच्या प्रशिक्षणाचा फायदा घेत माझे सुपर ग्रँडमास्टर जागतिक विजेता बनण्याचे स्वप्न आहे. सध्या माझे २४९७ गुणांकन आहे. २७०० पर्यंत जाण्यासाठी मला परदेशातील स्पर्धेत भाग घ्यावा लागणार आहे. कारण या दर्जाचे खेळाडू भारतात बोटावर मोजण्याइतकेच आहेत.’

अन्य खेळाकडे दुर्लक्ष होते : सर्वातलहान वयात म्हणजेच १८ व्या वर्षात ग्रँडमास्टर किताब मिळालेला महाराष्ट्रातला हा पहिलाच बुद्धिबळपटू आहे. जागतिक फिडे संघटनेने जानेवारी २०१६ मध्ये हा किताब जाहीर केला. परंतु याकडे ना सरकारने लक्ष दिले ना प्रसिद्धी माध्यमांनी. जगात बोटावर मोजण्याइतक्या देशात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटला फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे अन्य खेळाकडे दुलर्क्ष होते, अशी खंत डॉक्टरी पेशात असलेल्या त्यांच्या आईवडिलांची आहे. ते म्हणाले, हा किताब मिळविण्यासाठी त्याला एक तप लागले. रशिया, चीन, स्पेन, तुर्की, इरान, ग्रीस, व्हिएतनाम लंडन या देशात जाऊन स्पर्धा खेळाव्या लागल्या. अभ्यासात ८० टक्के प्रगती असलेला शार्दूल पुढील वर्षी बारावीत जात आहे. त्याच्या या कामगिरीची दखल ओनजीसी कंपनीने घेत त्याला वर्षाला १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.

शार्दूलचा आलेख : व्या वर्षी खेळाची सुरुवात. २००४ पासून कामगिरीस सुरुवात. राष्ट्रीय स्पर्धेत वर्षे गटात सुवर्ण, वेळा भारताचे प्रतिनिधित्त्व, आशियाई स्पर्धेत १० वर्षे गटात सुवर्ण, २००८ मध्ये १२ वर्षे गटात कांस्य, २०१३ २०१४ मध्ये जागतिक स्पर्धेत कांस्य सुवर्ण, २०१३ मध्ये इंटरनॅशनल मास्टर तर जानेवारी २०१६ मध्ये ग्रँडमास्टर.

देशातला ४२ वा, राज्यातला 6 वा ग्रँडमास्टर
देशातला४२ वा तर महाराष्ट्रातील तो सहावा ग्रँडमास्टर आहे. ते ग्रँडमास्टर असे : प्रवीण ठिपसे (मुंबई), अभिजित कुंटे, अक्षयराज कोरे (पुणे) , विधित गुजराती (नाशिक), स्वप्नील ढोपाडे (नागपूर), शार्दूल गागरे (राहुरी).

शार्दूलचे प्रशिक्षक
प्रकाशगुजराती (नगर), ज्योती प्रकाशन (मद्रास), अभिजित कुंटे (पुणे), रघुनंदन गोखले (मुंबई), अॅलन ग्रीनफील्ड (इस्रायल), तेजस बकरे (गुजरात), गोलोश्चपोव अलेक्झांडर (विप्रेन)