आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणीच्या नावाखाली एजन्सींची लूट, तपासणी शुल्क असते ७५ रुपये, उकळतात १९० रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दरवर्षी घरगुती गॅस कनेक्शनची तपासणी करणे बंधनकारक असल्याचे सांगत काही गॅस एजन्सींकडून चक्क १९० ते २०० रुपयांपर्यंत पैसे अाकारले जात असल्याचे दिसून अाले अाहे. गेल्या वर्षापर्यंत या तपासणीचे शुल्क ७५ रुपये होते, मात्र यंदापासून अचानक १९० रुपये घेतले जात असल्याचे समोर आले. गॅस कंपन्यांच्या वतीने दर दोन वर्षांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गॅस कनेक्शनची तपासणी केली जाते. त्यासाठी शासनमान्य शुल्क ७५ रुपये आकारण्यात येते. सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी आवश्यक असली तरी शासनाकडून त्याची सक्ती नाही. परंतु, शहरातील काही गॅस एजन्सींकडून या तपासणीसाठी सक्ती केली जात आहे. तसेच, ही शासनाचीच स्कीम असून, तपासणी सक्तीचीच आहे. गॅस तपासणी केली नाही तर पुढील सिलिंडर मिळणार नाही, अशी भीती घालून प्रत्येक ग्राहकाकडून या तपासणीच्या नावाखाली सर्रास १९० रुपये उकळण्याचा प्रकार शहरात सुरू असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे येत आहेत. मुख्य म्हणजे, गॅस उपकरणांची कुठल्याही प्रकारे तपासणी करता कागदावर टीकमार्क करून पैसे घेतले जात अाहे.

‘उपकरणचेकिंग चार्ज’च्या नावाखाली पैशांची लूट
‘उपकरणचेकिंग चार्ज’च्या नावाखाली ग्राहकांची सर्रास लूट सुरू असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. केवळ गॅस सिलिंडरला पाहून, रेग्युलेटर वर-खाली करून तपासणी पूर्ण झाल्याचे सांगत ग्राहकांडून पैसे घेतले जातात. एजन्सीकडून होणारी ही तपासणी खराेखरच सुरक्षेसाठी आहे की रक्कम उकळण्यासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो. या सक्तीच्या वसुलीमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेच्या माध्यमातून तक्रारी करण्यास सुरुवात झाली.

गॅस अदालत घ्या, मनमानी संपवा
-वितरकांचीमनमानीमोडून काढण्यासाठी ग्राहकांनी एकत्र येऊन लढणे हाच पर्याय अाहे. १९९६ मध्ये मी अशाच संघटनेची बांधणी केली. त्याच्या माध्यमातून गॅस अदालत अायोजिली होती. एका मस्तवाल वितरकाने ती उधळून लावली होती. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यांनी स्वत: अदालतीत भरवली. अनेकांच्या तक्रारींचे निवारण केले. अशाच पद्धतीने सोलापूर गॅस ग्राहक संघाने काम करावे.''
चंदुभाईदेढिया, सामाजिक कार्यकर्ते

ग्राहकांनाे, तक्रारींसाठी येथे साधा
संपर्क, टोलफ्री क्रमांक उपलब्ध
वितरकांविषयीच्यातक्रारी दोन ठिकाणी करता येतात. एक संबंधित गॅस कंपन्यांचे विक्री अधिकारी, विभागीय अधिकारी आणि ग्राहक तक्रार निवारण केंद्र. दुसरी तक्रार जिल्हा नागरी पुरवठा अधिकाऱ्यांकडेही करता येते. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आणि टोलफ्री क्रमांक उपलब्ध आहेत. १८००२३३३५५५ हा क्रमांक ३४ तास सुरू राहील. या पेक्षी कंपन्यांच्या संकेतस्थळावर तपशीलवार तक्रार करण्याची सोयही आहे.

अधिक पैशाची मागणी सुरूच
गॅस सिलिंडरच्या ठरलेल्या दरापेक्षा अधिक पैशाची मागणी अद्यापही काही ठिकाणी सुरूच आहे. याबाबत डीबी-स्टारने प्रकाश टाकला होता. त्याने ग्राहकांत जनजागृती झाली. अनेक ग्राहकांनी अधिक पैसे देणार नाही, असे ठामपणे सांगितले. परंतु पूर्वभागातल्या कामगार वसाहतीत अजूनही हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत काही जणांनी थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी सूचना केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी परत नेलेला सिलिंडर अाणून दिला, हा अनुभव ग्राहकांनी सांगितला.

दोन लाख ग्राहक
सोलापूर गॅस ग्राहक संघाची स्थापना
गॅस ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ‘सोलापूर गॅस ग्राहक संघ’ स्थापन झाली आहे. मार्कंडेय उद्यानात झालेल्या बैठकीत या संघाची घोषणा झाली. त्याच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी तर सचिवपदी रवींद्र जोगीपेठकर यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकारी : प्रा. व्यंकटेश पडाल (मार्गदर्शक), दिलीप निंबाळकर, नागनाथ नवगिरे, बाबू गिरगल, राजू पडाल, रामकृष्ण यन्नम, दत्तात्रय बडगू, राजशेखर येमूल, रामकृष्ण श्रीराम, कमल अग्रवाल (सर्व उपाध्यक्ष), बाबूराव क्षीरसागर (कार्याध्यक्ष), हरिदास बोड्डू (खजिनदार), वासुदेव लगशेट्टी (सहसचिव), पांडुरंग कुलकर्णी (प्रसिद्धिप्रमुख).

अनेक बाबींत फक्त लूटच दिसते
-
तपासणी,पाइपबदलण्याच्या नावाखाली वितरकांकडून लूटच होत असते. काही ग्राहक या बाबींकडे बारकाईने पाहत नाहीत. काही ग्राहक प्रशासन आणि कंपन्यांकडे तक्रारी करतात. परंतु त्यांचे निरसन होत नाही. त्यामुळे वितरकांचे फावते. प्रशासनाने तक्रारींची वेळीच दखल घेतली तर या बाबी रोखणे शक्य आहे. परंतु यंत्रणाच उदासीन असल्याने ग्राहकांनीच दबाव वाढवला पाहिजे. संघटित लढ्यासाठी आम्ही तयार आहोत.''
मदनबुर्गुल, ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष

एसएमएसद्वारे दिली जात आहे माहिती
‘लवकरच आमचा मेकॅनिक अापल्याकडे तपासणीसाठी येईल, त्याला सहकार्य करून रुपये १९० रुपये देऊन त्याबाबतची पावती घ्यावी,’ असे संदेश भारत गॅस कंपनीच्या वतीने ग्राहकांना मोबाइलवर पाठविले जात आहेत. ज्या लोकांना या संदर्भात एसएमएस आला आहे, त्यांच्या घरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भेटही दिली जात आहे. मात्र, या तपासणीचे तब्बल १९० रुपये ग्राहकांकडून घेतले जाते. त्याची रीतसर पावती दिली जात नाही.

तपासणीची सक्ती नाहीच
दर दोन वर्षांनी भारत गॅसतर्फे ग्राहकांना हवे असल्यास गॅस कनेक्शनविषयक ग्राहक जनप्रबोधन करण्यात येत असते. या प्रबोधनासाठी शुल्क म्हणून ७५ रुपये अाकारले जात असल्याची माहिती मिळाली आहे. गॅस कनेक्शन तपासणी करायची आहे की नाही, याचा अधिकार ग्राहकांनाच असून, त्यासाठी सक्ती करणे पूर्णत: चुकीचे असल्याचेही अधिकृत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले अाहे.

नि:शुल्क असावी तपासणी
गॅस कनेक्शन विकल्यानंतर ग्राहकांच्या सुरक्षेसाठी तपासणी वारंवार आणि नि:शुल्क करून देण्याची गॅस एजन्सीची जबाबदारी आहे. मात्र, शासनाकडून असे कोणतेही बंधन नसल्याचे गॅस एजन्सीकडून सांगितले जात आहे. कुठलीही तपासणी करता एजन्सी ग्राहकांकडून प्रत्येक कनेक्शनमागे १९० रुपये आकारत आहे. या तपासणीची चौकशी पुरवठा विभागाने करण्याची गरज असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

अशी केली जातेय गॅस सिलिंडरची तपासणी...
घरी गॅस सिलिंडर पुरविणारा व्यक्तीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत उघडकीस आले आहे. तपासणीसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची नेमणूक करणे गरजेचे असताना, गॅस सिलिंडर पुरविणारा व्यक्तीच ही सर्व तपासणी करत आहे. या डिलिव्हरी बॉयला मेकॅनिकल म्हणून तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोबत असलेल्या एका कागदावर ‘हो किंवा नाही’मध्ये माहिती भरावयाच्या कागदावर तो स्वत:च टिक करतो. अर्धा एक मिनिटात त्याची दारातूनच तपासणी पूर्ण होते. कागदावरील पूर्ण रकाने भरल्यानंतर ग्राहकाच्या हाती कागद सोपवून रकमेची मागणी केली जाते. तपासणीबाबत विचारणा केल्यानंतर ‘अहो साहेब तपासणी झाली आहे, तुम्हाला माहीत का आम्हाला?’ असे माेघम उत्तर देऊन सर्रास लूट सुरू अाहे.

शुल्क बंधनकारकच; मात्र जादा
वसुली चुकीचीच, तक्रारी करा

दरदोन वर्षांनी गॅस तपासणी करणे गरजेचे असून, तपासणीसाठी ७५ रुपये देणे बंधनकारक आहे. तसे आदेश शासनाकडून गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना आहेत. त्यापेक्षा अधिक रक्कम घेणे चुकीचे आहे. याबाबत रीतसर तक्रार करा. त्याची दखल घेतली जाईल. ऑनलाइन तक्रारही करू शकता, असे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासनाची याेजना असल्याचे सांगत सर्रास लूट...
गॅस कनेक्शनची तपासणी ही शासनाचीच योजना असल्याचे काही गॅस एजन्सींच्या व्यवस्थापकांनी सांगितले. मात्र, या तपासणीत शासनाच्या कोणत्याही कागदपत्रांचा वापर केला जात नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले. तपासणीच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या या व्यक्तींकडे शासनाचा लोगो अथवा सिम्बॉल असलेली कुठलीही कागदपत्रे नाहीत. केवळ भारत गॅस असे लिहिलेल्या कागदावर ग्राहकांकडून विविध प्रश्नांची उत्तरे ‘होय अथवा नाही’ या स्वरूपात भरून घेतली जात आहे. तसेच, ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर गॅस पाहून दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत पैसे मागितले जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...