आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने पाॅलिशच्या बहाण्याने फसवणूक; दोघांना कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -  विजापूरनाका झोपडपट्टीतील रजीया रहीन शेख यांच्याकडून पाॅलिशच्या बहाण्याने चाळीस - पन्नास हजार किमतीचे दागिने घेऊन पळून गेलेल्या दोघा संशयितांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी घडली होती. शुक्रवारी सायंकाळी दोघांना अटक झाली अाहे. 

रोशन हिरालाल मलहार (वय ३२), गीता रोशन मलहार (वय २०, रा. दोघेजण - महाराजनगर, शारदा माता मंदिराजवळ, ता. जिल्हा कटनी, मध्य प्रदेश) यांना शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. अार. शेंडगे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर नऊ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात अाली. 

रजीया या घरात असताना वरील दोघेजण दागिन्यांना पाॅलिश करतो. जुनी भांडी घेऊन नवीन भांडी देतो, अशी थाप मारून घरात अाले. दागिन्यांना या पावडरने पाॅलिश करतो असे म्हणत शेख यांच्याजवळ पावडर नेली. त्यांना थोडीशी गुंगी अाली. याच दरम्यान दागिनेही काढून दिले. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजापूर नाका पोलिसांत तक्रार दिली. संशयावरून पोलिस तपास करत असताना दोघेजण रेल्वे स्थानक भागात फिरताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. ४० हजार किमतीचे दागिने जप्त करण्यात अाले अाहेत. 

मध्य प्रदेशातील ही टोळी अाहे. एकूण सहा जण अाहेत. शहरात अाणखी असे प्रकार केले का? याची चौकशी सुरू अाहे. मध्य प्रदेश पोलिसांनाही याची माहिती देणार असल्याचे पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी सांगितले. सर्वजण अक्कलकोट रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिराजवळ तंबू मारून राहत होते. दोघांना अटक झाल्याचे समजताच अन्य चौघे सर्व साहित्य घेऊन पळून गेल्याचे सांगण्यात अाले. सरकारतर्फे अॅड. संतोष पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. 
बातम्या आणखी आहेत...