आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात तयार झाले गणपतीवर फ्री मोबाइल अॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बुद्धीची देवता गणरायाचा उत्सव तरुणाईने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विविध प्रकारे केल्याचे दिसत आहे. सोलापुरातील सनराइज संस्थेतील तरुणांनी ‘श्री’ आरती संग्रह नामक एक अँड्रॉइड मोबाइल अॅप सुरू केले आहे. याद्वारे आरती, प्रार्थना, पूजा करतानाच्या विधीचे मंत्र आदींची ऑडिओ माहिती मोफत मिळत आहे. शक्ती श्रीकांती निलंगे, विजय चिनगुंडे, गिरीश तंबाखे आणि पूजा बिराजदार यांनी अॅपला मूर्तरूप दिले आहे. या अॅपमध्ये जाहिरात नाही, त्यामुळे अॅप डाउनलोड करताना चार्जेस लागत नाही.
अॅपद्वारे पूजेची सर्वच माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अॅप डाउनलोड करताना इमेल अॅड्रेस पासवर्ड द्यावा. मोफत असल्याने सर्वांनी डाउनलोड करावे. गिरीश तंबाखे, अॅपमेकर