आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम मैदानावर लाडू देणारा गणपती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्वामी नारायण गुरुकुल स्कूल, कुंभारी यांच्या वतीने यावर्षी होम मैदान येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तेथे येणाऱ्या भक्तांना लाडू देणारा गणपती असून, मुलांसाठी बोलणारा अजगर असणार आहे. याशिवाय कैलास पर्वतावरील शिवपार्वती दर्शन, शेषनागावरील भगवान विष्णू दर्शन, दशावतार, बाळकृष्णाचा पाळणा हलवणारे नंदबाबा आदी देखावा असणार अाहे. दहा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार अाहेत, अशी माहिती कृष्णचरण स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी दुपारी अशोक चौकातून मिरवणूक निघेल. सायंकाळी पाच वाजता होम मैदान येथे पोहोचणार आहे. यात स्वच्छ भारत, सांस्कृतिक भारत देखावा असणार आहे. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पूजा होणार आहे.
ते १३ सप्टंेबर दरम्यान रोज दुपारी साडेतीन ते साडेपाच यावेळेत हाेम मैदान येथे छोटा आणि मोठा गटात दहा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात ५० ते ६० शाळेचे विद्यार्थी सहभागी होतील. समूह गायन, वक्तृत्व, गणेशमूर्ती तयार करणे, गायन, स्पेल बी, समूह नृत्य, चित्रकला, लघुनाटिका, मूकनाटिका, योगासन आदी स्पर्धा आहेत. १४ सप्टेंबर रोजी पारितोषक वितरण होईल. २५ आणि ११ हजार रुपयांचे बक्षीस असणार आहे, अशी माहिती कृष्णचरण स्वामी यांनी दिली. यावेळी आत्मस्वरूप स्वामी, मदाक काझी, राजेंद्र वर्देकर आदी उपस्थित होते. रोज सायंकाळी विशेष पूजा होणार आहे. नागरिकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

>२५ हजारांचे पहिले बक्षीस तर ११ हजारांचे दुसरे बक्षीस असणार आहे.
>विद्यार्थ्यांसोबत पालकही मिरवणुकीत असणार.
>प्रत्येक स्पर्धेसाठी ५० गुण असतील.
बातम्या आणखी आहेत...