आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगमन गणेशाचे: १५०० मंडळे, पारंपरिक वाद्यात स्वागत, पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी पेठचा राजा जयहिंद चौक तरुण मंडळ मूर्ती. - Divya Marathi
नवी पेठचा राजा जयहिंद चौक तरुण मंडळ मूर्ती.
सोलापूर - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात सोमवारी लाडक्या गणरायांचे स्वागत करण्यात आले. दिवसभरात सुमारे १५०० मंडळांनी पारंपरिक वाद्यांसह जल्लोषात स्वागत केले. सकाळी नऊपर्यंतच गणेश प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी वावडी व्हॉट्सअॅपवर उठल्याने आबालवृद्धांची अगदी सकाळपासून गणपतीमूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग दिसून आली.
शहरातील होम मैदान, पुंजाल मैदान, विजापूर नाका, टिळक चौक, कोंतम चौक, आसरा चौक, रेल्वे स्टेशन, संभाजी तलाव परिसर आदी भागात गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली हाेती. येथे घरगुती मूर्तींपासून मंडळांच्या मोठ्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. तसेच राजस्थानी कलावंतांनी पूर्व भागातील मूर्तिकारांनी विविध भागात आपल्या गोडाऊन्समधूनच मूर्तींची विक्री केली. सकाळी आठ वाजताच शहरास जत्रेचे स्वरूप आले होते. गणेशभक्त सहकुटुंब बाप्पांना आणण्यासाठी येत होते. हार, दुर्वा, नारळ, अरगजा आदी पूजा साहित्यांची विक्री होताना दिसत होती. मिरवणुकीत अरगजा, गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या आणि इको फ्रेंडली रंगाचा वापर दिसला. महिलांसह तरुणींचा सहभागही मोठा होता.

लेझीमच्या लयबद्ध मिरवणुका
विविधमंडळांनी मिरणुकीद्वारे गणेशाची स्थापना केली. श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाने सकाळी १० च्या सुमारास सुरुवात केली. यात दुपारी दोन वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख आले. त्यांनी लेझीम ताफ्यात शिरत हातात लेझीम घेत ठेका धरला. इंडियन मॉडेल स्कूलचे विद्यार्थी पगडी, लाल अंगरखा घालून पेशवा पोषाखात तर मुलींनी नऊ-वारीच्या पारंपरिक वेशात ढोल पथक होते. चंडक बगिचामधील सुवर्ण गणपतीच्या मिरवणुकीत तरुणींचा लेझीम ताफ्यासह सहभाग होता.

पारंपरिक वाद्ये, लेझीमवर होता भर
ढोल,ताशा, संबळ लेझीम आदी पारंपरिक वाद्यांवर मिरवणुकांचा भर होता. चौत्रा पुना नाका, वडार गल्ली श्री आय्या गणपती आकर्षक फुलांच्या रथात विराजमान होता. पुना नाक्याच्या मंडळाने भगवा फेटा, पांढरा झब्बा असा पेहराव केला होता. मानाचा आजोबा गणपतीची सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या हस्ते पूजा झाली.

मोठ्या गणपतींची प्रतिष्ठापना
सोन्या मारुती प्रतिष्ठान, बाळीवेस गणपती, पणजोबा गणपती, ताता गणपती आदी मोठ्या मंडळांनी विधिवत पूजन करीत मूर्ती मंडळात प्रतिस्थापित केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...