आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री विठ्ठलाच्या पाद्यपूजा बंदीला काेर्टात अाव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - सुमारे३०० वर्षांपासून आषाढी कार्तिकी एकादशीला खासगीवाले कुटुंबीयांकडून केली जाणारी श्री विठ्ठलाची पाद्यपूजा यंदापासून बंद करण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तो मागे घेतल्यास आषाढीला शहरातून निघणारा रथोत्सव बंद करू, असा इशारा खासगीवाले यांच्या अकराव्या पिढीतील संजय भालचंद्र खासगीवाले यांनी गुरुवारी मंदिर प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला. तसेच दोन दिवसांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाविकांना २४ तास दर्शनासाठी श्री विठ्ठलाचे नित्योपचार बंद करण्याच्या निर्णयाचा वाद संपत नाही ताेच आषाढी एकादशीला मध्यरात्री खासगीवाल्यांकडून केली जाणारी श्री विठ्ठलाची पाद्यपूजा बंद करण्याच्या जिल्हाधिका-यांच्या निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंदिर प्रशासनाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर त्याविरोधात याचिका दाखल करण्यासाठी संजय खासगीवाले पुण्याहून आले होते. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी पाद्यपूजा बंद केल्याच्या निर्णयाचे पत्रही खासगीवाले यांना दिले.
कायद्यातउल्लेखच नाही
खासगीवालेहे मंदिरातील उत्पन्न घेणारे नसून यजमान होते. त्यामुळे विठ्ठल मंदिर कायद्यातील निर्देशांचा सोयीस्कर अर्थ लावून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. विठ्ठल मंदिर कायद्याने बडवे, उत्पात, सेवाधा-यांचे हक्क आणि अधिकार संपुष्टात आले. मात्र, यजमानांचे हक्क अधिकार संपुष्टात आणावेत असे कुठेही त्या कायद्यात नसल्याचे खासगीवाले म्हणाले.