आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्याचा शेतकरी पुत्र तुषार कदम ‘आयआयटी’साठी ठरला पात्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शेतकरी कुटुंबातील असलेला माढ्याचा तुषार कदम हा आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजी) प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. त्याने सामूहिक प्रवेश परीक्षेत (जेईई अॅडव्हान्स) ४०३० रँक मिळवली. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या तुषार कदम याचे माढ्यात जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झाले. अवघे सहा एकर जिरायत जमीन असल्याने उत्पन्न तुटपुंजे. त्यामुळे शिक्षण घेणे जिकिरीचे होत होते. दहावीला ९४ टक्के गुण मिळाले. ए. डी. जोशी महाविद्यालयात अकरावी-बारावी पूर्ण केले असून बारावी सायन्सला ९५ टक्के मिळाले.

वडील विलास कदम हे माढ्यात शेती करत असून त्यांचे शिक्षण बारावी झाले आहे. आई लता यांचेही शिक्षण तेवढेच. पण त्यांनी तीन मुलींना उच्च शिक्षण देण्याचे ठरवले आहे. त्यांची मोठी मुलगी नुकतेच बी. ई. झाली असून दुसरी बीसीएस करतेय. पण तुषारने त्यापुढे झेप घेतली.
जोशी महाविद्यालयात तुषारचा सोमवारी सत्कार झाला. अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जाेशी, सचिवा सायली जोशी, प्राचार्य प्रवीण देशपांडे यांनी त्याचे यश मिळवल्याने अभिनंदन केले. यावेळी आई-वडील, शिक्षक गणेश जोशी, महाविद्यालयातील पर्यवेक्षिका मेधा त्रिवेदी उपस्थित होते.

तुषारची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य शेतकरी पुत्रासारखी आहे. यावर मात करत त्याने आयआयटी प्रवेशापर्यंत घेतलेली झेप वाखाणण्याजोगी आहे. केवळ जिद्द, कष्टाची तयारी, प्रामाणिक प्रयत्न हे त्याच्या यशाचे रहस्य आहे. आमच्या महाविद्यालयातील शिक्षकांच्या माध्यमातून त्याला सर्व ती मदत करण्यात येणार आहे, असे महाविद्यालयाचे अध्यक्ष जोशी यांनी सांगितले.

तंत्र किंवा स्थापत्य
दहावीपर्यं तमाढ्यात जिल्हा परिषद शाळेत शिकलो. रोज अभ्यास करून सराव केला. माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन, जोशी सरांमुळे सतत प्रेरणा मिळाली. क्लास लावता अभ्यास केला. परीक्षा दिली. रँकनुसार जोधपूर, गांधीनगर, पटणा आयआयटी येथे किंवा कोठेही मिळो, मेकॅनिकल किंवा सिव्हिल शाखा निवडेन. तुषार कदम, रँकर,जेईईए
जोशी कनिष्ठ महाविद्यालयात तुषार कदम याचा सत्कार करताना ए. डी. जोशी. सोबत वडील विलास, आई लता, प्राचार्य प्रवीण देशपांडे.