आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘म्हाडा’ पालकमंत्र्यांना म्हणते, घरांचे दर कमी केले तर तोटा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुळे सोलापूर आणि सात रस्त्यावरील ‘म्हाडा’च्या घरांचे दर अधिक का? अशी विचारणा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली. त्यावर म्हाडाने उत्तर दिले, ‘घरांचे दर कमी केले तर मंडळ तोट्यात जाईल.’ ही बाब खासगी बिल्डरना सांगितल्यानंतर त्यांनी मार्मिक उत्तर दिले, ‘मग कमी दर घेऊन आम्ही किती तोटा सहन करतोय पाहा...’
पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने दोन्ही गृहप्रकल्पातील ११९ घरांची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचे दर मात्र खासगी बिल्डरांच्या तुलनेत एक हजार ते पंधराशे (रुपये प्रती चौरस फूट) रुपये अधिक ठेवले आहेत. सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण असलेली ‘म्हाडा’ बिल्डरांपेक्षा अधिक दर घेते तर हे प्राधिकरण ठेवायचेच कशाला? अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. घरांच्या या दराविषयी पालकमंत्र्यांनीही लक्ष घातले. त्यांना दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात आली. याबाबत अधिक माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे श्री. देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
लोकांना वेड्यात काढू नये

सुनीलफुरडे, क्रेडाईचे माजी अध्यक्ष
जमिनीच्या किमती वाढल्या की घरांचे दर वाढतात. त्यानुसार म्हाडाने दर वाढवले का? उत्तर आहे, नाही. ‘म्हाडा’ने त्याचे उत्तर ‘हो’ म्हणून दिले तर त्याची झळ आम्हा बिल्डरांनाही बसली पाहिजे. म्हणजेच आम्ही निर्माण केलेल्या घरांचे दरही वाढलेच पाहिजेत. प्रत्यक्ष स्थिती तशी नाही. दरवाढीचे स्पष्टीकरण देताना, म्हाडाने खासगी बिल्डरांकडे बोट दाखवले आहे. म्हणे, बिल्डर लोक वीज, पाण्याची व्यवस्था करून देत नाहीत. आम्ही या साऱ्या बाबी करून दिल्या. त्या किती छान करून दिल्या, हे पाहायला मी जुळे सोलापुरात गेलो. सारे काही नटबोल्टने फिट केलेले काम. कुठल्याही गोष्टीला दर्जा नाही. उलट म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आम्हा बिल्डरांची घरे पाहावीत. सुविधा म्हणजे काय असतात, हे समजून घ्यावे. शिवाय या घरांचे दर तीन हजार रुपये फूटपेक्षा जास्त नाही. मी तर म्हणतो, म्हाडाने याच दराने प्रकल्पातील सर्व घरे विकून दाखवावीत. उलट प्रकार असा होईल, की ‘म्हाडा’पेक्षा कमी दरातील दर्जेदार घरे खासगी बिल्डरांकडे आहेत, हे लोकांना कळेल. जे आमच्याच हिताचे आहे. एक वाटते की सरकारी यंत्रणेने लोकांना वेड्यात काढू नये.
बातम्या आणखी आहेत...