आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखावल्या सुवासिनी, महालक्ष्मी आली भोजना घरी, सर्वत्र लगबग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भाजीभाकरीचा नैवेद्य घेतलेल्या गौरींनी आज पुरणाचा आणि सोळा भाज्यांचा नैवेद्य घेतल्याने प्रसन्न मुखाने चकाकणाऱ्या गौरींचे मांडव पाहून घरोघरच्या सुवासिनी सुखावल्या होत्या.
साड्यांचे पडदे, शाेभेच्या वस्तु आणि विविध प्रकारच्या खेळण्यांनी घरोघरच्या मांडवात गौरींचे रूप देखणे दिसत होते. यावेळी महिलांनी आपल्या जिजाऊ आाणि लक्ष्मीची पूजा सोलापूरच्या गड्ड्याचा देखावा अशा प्रकारच्या वेगळ्या सजावटीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
बहुतांश महिलांनी पारंपरिक पध्दतीने फराळ, खेळण्यांची, फळांची सजावट केली होती, तर काही निवडक महिलांनी वेगळ्या सजावटीने पारंपरिकतेतही नव्या विचारांची संागड घालत देखावे सजविले हाेते. जुळे सोलापूरच्या सुनीता पाटील यांनी निसर्गाचे नाते सांगणारा कास पठार त्यावर टिशूची रंगीत फुले आणि नाचणारा मखमली मोर याचा देखावा केला होता. नंदा शिंदे यांनी एका तांब्यावर तांब्यावरच्या लक्ष्मीचे पूजन केले तर त्याच ठिकाणी दुसऱ्या पाटावर राजमाता जिजाऊचे पूजन केले. या वेगळ्या आणि गोड देखाव्यांनी सगळ्यांच्याच मनात धाडसाची भावना निर्माण केली हाेती.

विजापूर रस्ता परिसरातील पूजा ढाकणे यांनी गौरींच्या पुढ्यात सोलापूरच्या गड्डा यात्रेची प्रतिकृती उभी केली होती. तर प्रभावती हब्बू यांनी पर्यावरणाला जपा असे संगणारे भव्य वडाचे झाड तयार केले आहे. त्याच्यासमाेर त्यांनी हिरवळीचे देखावे केले आहेत.

शिवगंगा मंदिर मराठा वस्ती परिसारातील विजयकुमार काळे यांच्या घरी महालक्ष्मींच्या समोर ‘महाराष्ट्र माझा दुष्काळग्रस्त’वर सजावट केली आहे. पर्यावरण, पाणी वाचवा असा संदेश दिला. लातूर येथे सुरू केलेली जलदूत एक्स्प्रेस याचा त्यात समावेश आहे.

सुवासिनींची होती मांदियाळी
संध्याकाळपर्यंत हळदीकुंकू घेण्याचे कार्यक्रम आटोपण्यासाठी सुवासिनी नातेवाईकांकडे जाणे, शेजारी, सूमहाने मैत्रिणींच्या घरी जाणे-येणे सुरू ठेवले होते. त्याने महिलांची मोठ्या प्रमाणावर मांदियाळी होती. जरीच्या साड्या नेसून नटलेल्या महिला समूहाने जात येत होत्या.

निसर्ग संुदर आहे
^कासचे पठार हे पृथ्वीला मिळालेले वरदान आहे. त्यावर विखुरलेले फुलांचे रान आणि पठाराचा भाग याने मन तृप्त होते. त्यावर नाचणारा मोर तयार केला आहे. दरवर्षी मी वेगळा देखावा तयार करत असते. त्या प्रमाणे यंदाच्या वर्षीही त्याचा आनंद घेतला आहे.” सुनीता पाटील, जुळे सोलापूर
बातम्या आणखी आहेत...