आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाच्या धडकेत धार्मिक कार्यक्रमाला जाणार्‍या माय-लेकाचा जागीच मृत्यु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी- पंढरपुरला नातेवाईकाकडे धार्मिक कार्यक्रमाला दुचाकीने (एमएच-13-4778) निघालेल्या माय-लेकाचा अपघातात जागेवर मृत्यू झाला. अविंदा सर्जेराव भोसले (वय-45) आणि प्रवीण सर्जेराव भोसले (वय-24, रा.पाटील वस्ती, पापरी, ता. मोहोळ) अशी मृतांचे नावे आहेत. आज (सोमवार) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

 

प्रवीण भोसले दुचाकी चालवत होता. पेनुर येथील दर्ग्याजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही माय-लेक रस्त्याशेजारील शेतात दूरपर्यंत फेकली गेली आणि जागेवरच त्यांचा मृत्यु झाला. या घटनेनेचे गावावर शोककळा पसरली आहे.

 

पुण्यात अभियंत्रकीचे शिक्षण पूर्ण करुन प्रवीण नुकताच एका खासगी कंपनीत रुजू झाला होता. तो  काल (रविवार) पुण्याहून पापरीला आला होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...