आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: सिद्धेश्वर साखर कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सिद्धेश्वर साखर कारखान्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कारखान्याच्या डिस्टलरी प्लांटमध्ये ही आग भडकल्याचे बोलले जात आहे. आगीत कारखान्यातील मशिनरीचे मोठे नुकसान झाले आहे.
 
दरम्यान, सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्यात लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...