आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार कामांचा प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - सिनेअभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशन संस्थेच्या वतीने तालुक्यातील वाठवडा गाव दत्तक घेण्यात आले आहे. येथे शुक्रवारी (दि. ६) अनासपुरेंच्या उपस्थितीत विविध कामांचा शुभारंभ केला जाणार आहे.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराच्या मदतीला अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे धावून आले आहेत. याचाच एक भाग म्हणून नाम फाउंडेशनने हे गाव दत्तक घेतले आहे. नाला सरळीकरण, ग्रामस्वच्छता, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छतागृह आदी विषयांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. शुक्रवारी चार वाजता अनासपुरे यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ते मार्गदर्शनही करणार आहेत. या कार्यक्रमाला कळंबचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुरेंद्र देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नाम संस्थेचे लातूर, उस्मानाबादचे समन्वयक डॉ. हर्षवर्धन रा‌ऊत, विलास चामने, सुधीर माने, विश्वनाथ कानडे, अभिजित देशमुख, नरेंद्र शिंदे, सतीश मडके यांनी केले आहे.