आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल कॅशलेस व्यवहार करा, जिल्हाधिकारी रणजितकुमार यांचे नागरिकांना आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील नागरिकांनी सर्व आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल कॅशलेस व्यवहारास प्राधान्य द्यावे. यंत्रणा उपलब्ध असलेल्या ठिकाणांहूनच व्यवहारास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी केले.
डिजिटल कॅशलेस पेमेंटसंदर्भात नीती आयोगामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कॉन्फरन्सला जिल्हाधिकारी रणजित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर उपस्थित होते. संपूर्ण देशात यापुढे कॅशलेस व्यवहारास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेच शहरी, ग्रामीण भागात यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नीती आयोगामार्फत सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील महा सेवा केंद्र, ग्रामपंचायती, शासकीय कार्यालयांनी डिजिटल कॅशलेस पेमेंट करावे. शहर, जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारी यांनी पॉस मशीन कार्यान्वित करून कॅशलेस व्यवहाराला अधिक प्राधान्य द्यावे. ज्या उद्योजकांकडे पाॅस यंत्रणा उपलब्ध नाही, त्यांनी पॉस (POS) मशीनची मागणी संबंधित बँकेकडे नोंदवावी. जनतेने आर्थिक व्यवहारासाठी डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्री-पेड कार्ड, मोबाइल बँकिंग, आधार कार्ड पेमेंट सिस्टिम, यूपीआय, वॅलेट सिस्टिमचा वापर करावा.

कॅशलेस व्यवहारासाठी लवकरच बैठक
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहार करण्यासाठी लवकरच बँका तसेच ट्रेडर्स यांची बैठक घेण्यात येणार आहे. यासंबंधी जिल्ह्यातील उद्योजक, कारखानदार व्यापारी यांच्याकडील पॉस यंत्रणेची उपलब्धतता, यंत्रणाची गरज याबाबत आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...