आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्र बोला हर्र ऽऽ..'सुवर्ण सिद्धेश्वर'ची उभारणी आजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: गुरुवारी सकाळी मंदिराच्या सभामंडपात मंदिर समिती अध्यक्ष धर्मराज काडादी, त्यांच्या पत्नी सौ. उमा काडादी यांच्या हस्ते मंदिर उभारण्यात येणाऱ्या चांदीच्या खांबाचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर सुशीला आबुटे, नगरसेवक चेतन नरोटे, सिद्धाराम चाकोते, मनोहर सपाटे, जगदीश पाटील आदी.
सोलापूर - 'दैनिक दिव्य मराठी'ने मांडलेल्या 'सुवर्ण सिद्धेश्वर' या संकल्पनेला शुक्रवारपासून खऱ्याअर्थानं प्रारंभ होत आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी त्यांच्या पत्नी सौ. उमा यांनी गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर लावण्यात येणाऱ्या खांबाची पूजा केली. १५ जानेवारी २०१५ रोजी ‘दिव्य मराठी’ने सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर मंदिराची अमृतसर सुवर्ण मंदिराशी तुलना करीत सिद्धेश्वर मंदिर हे कसे सुवर्ण मंदिर बनू शकते, अशी संकल्पना मांडली होती. या नावीन्यपूर्ण संकल्पनेस भरभरून प्रतिसाद देत ग्रामदैवत सिद्धेेश्वर सुवर्ण मंदिराचे रूपडे यावे अशा भावना सोलापूरकरांनी व्यक्त केल्या होत्या.
देवस्थानच्या पंचसमितीनेही या लोकभावनेला प्रतिसाद देत मे २०१५ रोजी पत्रकार परिषदेत सुवर्ण सिद्धेेश्वर मंदिर उभारणीच्या संकल्पाची घोषणा केली होती. भक्तांना देणग्यांसाठी आवाहनही केले होते. बघता-बघता अवघ्या सात महिन्यांत तब्बल कोटी ५८ लाख रुपयांची भरीव देणगीही जमा झाली. अजूनही हा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत ३३३ किलो चांदी, किलो सोने रोख स्वरूपात कोटी ५४ लाख रुपये जमा झाले आहेत. मंदिरास सोन्याचांदीचे देखणे रूपडे आणण्याबरोबरच मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करीत एक उत्कृष्ट निसगर्रम्य पर्यटनस्थळ तयार करणे हा त्यामागचा उद्देश आहे. सुरुवातीस गर्भगृह बाहेरची दर्शनी बाजू त्यासमोरील चार खांब चांदीने मढवून नंतर सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे.

असा आहे खांब
सध्याबनवण्यात आलेला खांब साधारण ते सव्वापाच फूट असून प्रत्येकी वजन ३२ ते ३५ किलो आहे. याचे काम पुण्याच्या दगडूशेठ आप्पा हलवाई गणपती मंदिराचे काम केलेले नामवंत कारागीर सुरेश मिस्त्री हे करत आहेत. या खांबांवर द्रविडी प्रकारातील नक्षीकामाची कलाकुसर करण्यात आली आहे.

अजून बरेच काही
‘दिव्य मराठी’ने मांडलेली संकल्पना खूप संुदर होती. त्यास अनुसरून भक्तांनीही आमच्या आवाहनास भरभरून प्रतिसाद दिला. यंदा यात्रेपूर्वी गाभाऱ्यातील खांब दर्शनी भाग चांदीने मढवणार आहोत. त्यानंतर संपूर्ण गाभारा सोने चांदीने सजवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजयोत्सवाच्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात एका खांबाचे पूजन केले आहे. प्रत्यक्ष काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. धर्मराज काडादी, अध्यक्ष,श्री सिद्धेश्वर देवस्थान