आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maldhok Bird Sanctuary Water Tank On Solar Pump In Solapur

माळढोक पक्षी अभयारण्यातील पाणवठे भरले साैर पंपाद्वारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रामुख्याने व्याघ्रप्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या सौर पंपाद्वारे चालणारे पाणवठ्यांची उभारणी नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यात यंदाच्या वर्षी बसवली अाहे. साैर पंपावर चालणाऱ्या त्या स्वयंचलित पाणवठ्यांवर असंख्य वन्यजीव तहान भागवण्यासाठी येत असतात.

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यजीव रानोमाळ भटकंती करतात. घनदाट जंगल किंवा व्याघ्र प्रकल्पामधील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरणे अनेकदा वनकर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतणारे ठरू शकते. त्यावर पर्याय म्हणून सौर पंप बसवण्यात अालेत. त्या पंपास टायमर बसवले असल्याने दिवसभरात स्वयंचलित पाणवठे भरतात. पाणी भरण्यासाठी होणारी वर्दळ थांबल्याने वन्य जीवांचा वावर त्या पाणवठ्यावर वाढला असून, अभयारण्याच्या बाहेर पाण्याच्या शोधात वन्यजीव जाण्याचे प्रमाण घटले अाहे.

अभयारण्यात अर्ध्या अश्वशक्तीचा एक सौर पंपसेट अाहे. त्याद्वारे शंभर हेक्टर परिसरातील दोन पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यात येते. त्याचप्रमाणे लांडग्यांचा, अादिवास असलेल्या परिसरात तीन साैर पंप सेट हातपंपाला बसवले अाहेत. दिवसभरात दोन तास या पाणवठ्यामध्ये पाणी भरले जाते. केंद्र शासनाच्या वन्यप्राणी संरक्षण क्षेत्रात अावश्यक त्या सुविधा निर्माण करण्याच्या योजनेतून हे सौर पंप बसवले अाहेत. त्यासाठी दीड लाख खर्च अाला अाहे. यंदाच्यावर्षी प्रथमच अभयारण्यात हे पाणवठे उभारले अाहेत. त्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी अभयारण्याच्या बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाल्याची मािहती वन्य परीक्षेत्र अधिकारी अार. एन. कुलकर्णी यांनी दिली. हातपंप अन् साैरपंपही अभयारण्यातील विश्रामगृहाच्या शेजारील एका हातपंपास सौर पंप बसवला अाहे. त्या पंपास बिघाड झाल्यास हातपंपातून पाणी येऊ शकते, अशी सोय अाहे.

कूपनलिकांचे पुनर्भरण
सौर पंप बसवण्यात अालेल्या कूपनलिकांना जलपुनर्भरण करण्यात अाले अाहे. पावसाळ्यात त्या परिसरात पडणारे पाणी कूपनलिकेत मुरवण्याची व्यवस्था केली अाहे.
पक्षी निरीक्षणासाठी गवाताचे लपणगृह
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला अभयारण्यातील पाणवठ्यांवर वन्यजीवांची गणना करण्यात येते. त्यासाठी अभयारण्यातील दहा प्रमुख पाणवठ्यांवर गवताचे लपणगृह उभारले अाहे. त्यामुळे वन्यजीवांचे जवळून निरीक्षण करता येईल. वन्यजीवांना त्या लपणगृहांचे नावीन्य वाटू नये म्हणून दीडमहिना अगोदरच याची उभारणी केली अाहे.