आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोक पक्षाने सोलापूरचा लौकिक जगभर पोहोचवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देशातअत्यंत दुर्मिळ असलेल्या माळढोक पक्ष्यांमुळे सोलापूरचा लौकिक जागतिक स्तरावर पोचला आहे. त्या पक्ष्यांची घटती संख्या ही चिंतेची बाब असून गवताळ माळरान सुरक्षित राहण्यासाठी माळढोक आवश्यकच आहेत. पण, त्या पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी शासनाकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्याची खंत माळढोक अभ्यासक डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद््घाटन गुरुवारी सोलापूर विद्यापीठमध्ये झाले. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी एनटीपीसीचे व्यवस्थापक सुनीता सिंह, किर्लोस्कर फेरस कंंपनीचे डॉ. एस. पी. वैद्य, वसुंधरा महोत्सवाचे वीरेंद्र िचत्राव, कुलसचिव डॉ. माळी, विद्यापीठाच्या जनसंपर्क पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोळकर आदी उपस्थित होते. उद््घाटनप्रसंगी डॉ. पाटील यांचे ‘आपला माळढोक पक्षी’ या विषयावर व्याख्यान झाले.

याप्रसंगी श्री. चित्राव यांनी महोत्सवाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगितली. कुलसचिव डॉ. माळी यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या शैक्षणिक पर्यावरणीय कार्याची माहिती दिली. एनटीपीसीतर्फे राबविण्यात आलेल्या पर्यावरणीय उपक्रमांची माहिती व्यवस्थापक सिंह यांनी दिली. प्रा. अंबादास भासकी यांनी सूत्रसंचालन केले.

क्षेत्रघटविण्याची समितीची शिफारस
‘वन्यप्राण्यांमुळेमाणसांना त्रास झाला तरी, त्यांच्याबद्दल आदरभाव जपला जातो. सन २००१ मध्ये जगामध्ये ६०० पेक्षा जास्त माळढोक पक्ष्यांची संख्या होती. पण, सध्या ती फक्त २५० पेक्षाही कमी आहे. गवताळ माळरानांचे वैभव असलेल्या या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सरकारी योजना कुचकामी ठरल्या आहेत. नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र पूर्वी तब्बल साडेआठ हजार चौरस किलोमीटर होते. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्वतंत्र समितीने क्षेत्र घटविण्याची शिफारस केली. वन्यजीव कायद्यात बदलही झालेे असून क्षेत्र कमी झाले. आणखी क्षेत्र कमी करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. माळढोकांच्या संरक्षणासाठी अभयारण्याच्या परिक्षेत्रात होणारे अतिक्रमण, मोकाट जनावरांचा वाढता वावर, आैद्योगिकीकरण थांबविण्याची गरज आहे. मार्डी गावामध्ये कचऱ्यामुळे मोकाट कुत्री, कावळ्यांचा प्रादुर्भाव अभयारण्यातील माळढोकांना होतो,’ असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

छायाचित्र प्रदर्शनात विश्वजित नाईक यांनी युवकांना छायाचित्रे कशी काढावीत, त्याचा वेध कसा घ्यायचा, ते कसे काढायचे याचे मार्गदर्शन केले. त्यावेळी उपस्थित मान्यवर जनसमुदाय.

युवकांचाउत्तुंग प्रतिसाद
छायाचित्रप्रदर्शन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ती गर्दी छायाचित्रे पाहण्यासाठी विश्वजित नाईक यांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने जमली होती. त्यामुळे आयोजकांच्या प्रबोधनाचा हेतू तरुणाईपर्यंत पोहोचला. तरुणाईने मोठ्या प्रमाणावर आस्वाद घेतला.

विद्यापीठात ग्रीन बेल्ट
विद्यापीठचापरिसर पर्यावरणीय दृष्ट्या विकसित करण्यात येतोय. या परिसरात ‘ग्रीन बेल्ट’ तयार केला असून विद्यार्थ्यांचा त्यामध्ये मोठा सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानानुसार विद्यापीठात प्रत्येक बुधवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. विद्यार्थ्यांमध्येच त्याबाबतची जागरुकता निर्माण झाली असल्याचे कुलगुरू डॉ. मालदार यांनी सांगितले.
रोपाला पाणी घालून उद््घाटन
किर्लोस्करवसुंधरा महोत्सवाचे उद््घाटन अभिनव पद्धतीने झाले. शून्य कचरा ही अभियनाची संकल्पना आहे. मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून अभियानाचे उद््घाटन करण्यात आले.